मॅडम जर्सी नहीं, नजरें बदलो! टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर बोलणा-या हुमा कुरेशीला नेटक-यांचे उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 12:22 PM2019-07-01T12:22:12+5:302019-07-01T12:22:57+5:30
हुमा क्रिकेटचीही मोठी फॅन आहे. भारतीय क्रिकेट टीमला पाठींबा देणा-या हुमाने टीम इंडियाच्या ऑरेंज ब्ल्यू जर्सीवर ट्वीट केले. पण हे ट्वीट करून हुमा ट्रोल झाली.
अभिनेत्री हुमा कुरेशी ही सुद्धा आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह राहणारी हुमा अनेक मुद्यांवर आपली परखड मते मांडताना दिसते. हुमा क्रिकेटचीही मोठी फॅन आहे. भारतीय क्रिकेट टीमला पाठींबा देणा-या हुमाने टीम इंडियाच्या ऑरेंज ब्ल्यू जर्सीवर ट्वीट केले. पण हे ट्वीट करून हुमा ट्रोल झाली.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ऑरेंज ब्ल्यू जर्सी घातली होती. भगवी जर्सी परिधान करून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. पण या लढतीत भारताला यजमान इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव पत्कराव लागला होता. याच पार्श्वभूमीवर हुमाने एक ट्वीट केले.
Not superstitious at all .. but can we please have the Blue jersey back .. enough said 🤦🏻♀️
— Huma Qureshi (@humasqureshi) June 30, 2019
‘मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही. पण काय टीम इंडिया ब्ल्यू जर्सी पुन्हा परिधान करू शकते, एवढे म्हणणे पुरेसे आहे...,’ असे ट्वीट तिने केले. तिच्या या ट्वीटनंतर लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
Madam, जर्सी नही नज़रें बदलो। ये 1990 नही 2019 का भारत है। समझी
— shivam sahu (@shivam_sahu001) June 30, 2019
‘हुमा कुरेशी मॅडम, जर्सी नहीं नजरें बदलो. १९९० नाही तर हा २०१९ चा भारत आहे,’ असे एका युजरने तिला सुनावले.
Why? You have problem with saffron jersy?
— Anuj Jain (@anuj_jn) June 30, 2019
इसी जर्सी ने तुम्हारे मुल्क 🇵🇰 का सेमीफाइनल मे प्रवेश करना मुश्किल कर दिया 🤣 😂.
वैसे तुम भगवा में अच्छी लगती हो 👇 pic.twitter.com/V2DdqTC9Hg— Mitesh Patel(મિતેષ પટેલ)🇮🇳 (@patelmitesh_) June 30, 2019
तर एका युजरने ‘तुला भगव्या जर्सीवर इतका आक्षेप का?’ असा खरपूस सवाल तिला केला. अन्य एका युजरने तर ‘इतनी नौटंकी की जरूरत नहीं,’ अशा शब्दांत तिला सुनावले.
टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळे, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचे ‘इंडिया’ हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडले.