अशी भीती मला वाटत होती..., करण सिंग ग्रोव्हरने बिपाशासाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:10 PM2022-08-24T15:10:09+5:302022-08-24T15:21:27+5:30
Bipasha Basu : सध्या बिप्स तिची प्रेग्नेंसी एंजॉय करत आहे. आता करणने पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu ) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. होय, बिपाशा बासू प्रेग्नंट आहेत. सध्या बिप्स तिची प्रेग्नेंसी एंजॉय करत आहे. आता करणने पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आपण बाबा होणार असल्याचं कळल्यावर काय फीलिंग होती, हेही करणने सांगितलं आहे. सोबत, एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.
करणची पोस्ट...
करण लिहितो, ‘हे असंख्य भावनांचं मिश्रण आहे. सगळं नवीन आहे परंतु ओळखीचं आहे. मी हे यापूर्वी कधीही केलेलं नाही. पण हो, हे मी माझ्या अनमोल व सुंदर स्वप्नात अनुभवलं आहे. ही एक अशी तीव्र भावना आहे जी मी व्यक्त केलेली नाही. कारण उत्साहाच्या भरात मी वेगळंच काही करून बसेल, अशी भीती मला वाटत होती. आम्ही आईबाबा होणार आहोत, आमच्या घरी एक तान्हुला येणार आहे. आमचं छोटं व्हर्जन, छोटासा मंकी बेबी जन्मास येणार आहे हे कळल्यावर मी आनंदाने वेडा झाला होतो. ही भावना इतकी चांगली आणि इतकी उत्कट असेल, याचा मी विचारही केला नव्हता. एका स्त्रीमध्ये एक नवा जीव निर्माण करून तिच्या आयुष्याचा भाग बनवत असल्याबद्दल कृतज्ञ वाटतंय, मी बदलतोय. गोष्टी आणखी चांगल्या कशा होतील, त्यादिशेने प्रयत्न करतोय.
बिपाशाने गेल्या 16 ऑगस्टला आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. याआधी 2019 साली सुद्धा बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. बिपाशा व करण रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होती. या पार्टीचे फोटो फोटो समोर येताच, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं.पण ही अफवा निघाली होती.
2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.