'शेरशाह' या हिंदी चित्रपटात जवानाच्या भूमिकेत झळकणार या मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:04 IST2021-08-03T18:03:16+5:302021-08-03T18:04:13+5:30
कारगिलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट शेरशाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'शेरशाह' या हिंदी चित्रपटात जवानाच्या भूमिकेत झळकणार या मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा
कारगिलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट शेरशाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरचा नवरा हिमांशू अशोक मल्होत्रा दिसणार आहे. त्यानेच या चित्रपटातील त्याचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हिमांशूने बऱ्याच हिंदी मालिकेत काम केले आहे.
अभिनेता हिमांशू मल्होत्राने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी जवान देशाचा झेंडा फडकवणार. मेजर राजीव कपूर.
शेरशाह चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि हिमांशू मल्होत्राशिवाय कियारा अडवाणी,शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा दिसणार आहेत.
शेरशाहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कथा आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा रेखाटण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे.
‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते. हा चित्रपट १२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.