Mr. India तील क्यूट टीना आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून म्हणाल - ही टीना आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 03:08 PM2022-01-26T15:08:13+5:302022-01-26T15:30:23+5:30
Mr. India Girl Huzaan Khodaiji : तसं तर या सिनेमात सर्वच लहान मुलांनी भारी काम केलं होतं. पण 'टीना'ची भूमिका करणारी Huzaan Khodaiji चा रोल सर्वांनाच आवडला होता.
अनिल कपूरचा सिनेमा 'Mr. India' आजही लोकांना बघायला आवडतो. यात श्रीदेवी आणि लहान मुलांची मोठी फौज होती. हा सिनेमा आजही लहान मुलांना बघायला आवडतो आणि या सिनेमात काम केलेली सर्वच लहान मुले आज मोठी झाली आहेत. आपापल्या क्षेत्रात ते काम करत आहेत. तसं तर या सिनेमात सर्वच लहान मुलांनी भारी काम केलं होतं. पण 'टीना'ची भूमिका करणारी Huzaan Khodaiji चा रोल सर्वांनाच आवडला होता.
Huzaan Khodaiji ही तिच बालकलाकार आहे जिचा या सिनेमात एका बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. सिनेमात टीनाने आपल्या निरागपणाने आणि गालावरील डिंपलने सर्वांची मनं जिंकली होती. आता हुजान खोदैजी खूप मोठी आणि तेवढीच ग्लॅमरस झाली आहे. हुजानचा एक लेटेस्ट फोटो समोर आला आहे. वाचून आश्चर्य वाटेल की, Mr.India नंतर हुजान दुसऱ्या कोणत्याच सिनेमात दिसली नाही. आता ती मार्केटींग फिल्डमध्ये काम करत असल्याचं बोललं जातं.
एका मीडिया रिपोर्टनुसार, Huzaan Khodaiji लिंटास नावाच्या एका कंपनीत अॅडव्हरटायजिंग एक्झिक्यूटीव्ह म्हणून काम करत आहे. अर्थातच आता हुजान सिनेमांपासून दूर गेली आहे. पण तिच्या जादुई स्माइलने लोकांना आजही भुरळ घातली आहे. हुजान आज ४१ वर्षांची झाली आहे आणि दोन मुलींची आई आहे. मिस्टर इंडियात काम केलं तेव्हा ती केवळ ६ वर्षांची होती.