"मलाही वाटले होते आत्महत्या करावी"'.... सुशांतच्या निधनाबाबत बोलताना या अभिनेत्रीने केले अनेक धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:48 PM2020-06-17T16:48:00+5:302020-06-17T16:48:35+5:30
सुशांतबद्दल श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक भावूक पोस्टही शेअर केली. त्यात त्यांनी लिहीले होते की,‘‘इन अंधेरे दिनों में…काफी कुछ हो रहा है…दिलो-दिमाग एक बिंदू पर जाकर ठहर गया है…या सुन्न हो गया.'
चंदेरी दुनियेतील आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे.कधी काम मिळणे बंद होईल हे सांगणे कठिण. अनेक उत्तम कलाकारांना अचानक काम मिळणेेच बंद झाल्याने घरी बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. 90 च्या दशकातील अभिनेत्री दिप्ती नवल यांनीही त्याचा अनुभव शेअर केला आहे.
सुशांतच्या निधनाची बातमी ऐकताच दिप्ती नवल यांनाही धक्काच बसला. सोशल मीडियावर सुशांतबद्दल श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक भावूक पोस्टही शेअर केली. त्यात त्यांनी लिहीले होते की,‘‘इन अंधेरे दिनों में…काफी कुछ हो रहा है…दिलो-दिमाग एक बिंदू पर जाकर ठहर गया है…या सुन्न हो गया.'
आपल्या मनातील भावना व्यक्तक करताना दिप्ती नवल यांनीदेखील एक धक्कादायक खुलासा केला. सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या मानसिक स्थितीबाबत त्यांनी एक पोस्ट केली आहे. 90 व्या दशकाच्या अखेरीस त्यांना काम मिळणं बंद झालं होतं. जे अपयश सहन करणं त्यांच्यासाठी कठीण जात होतं. त्यामुळेच त्यांचेही मानसिक संतुलन बिघडले होते. त्यादरम्यान मनात सारखे आत्महत्या करण्याचे विचार यायचे.मात्र इतक्या टोकाचे पाऊल न उचलता मोठ्या धैर्याने या डिप्रेशनचा सामना केला आणि त्यातून बाहेर पडले. हा डिप्रेशनचा कालावधी खडतर आणि आव्हानात्मक होता असंही त्यांनी सांगितले.
तसेच डिप्रेशनचा सामना करताना दिप्ती यांनी एक कविताही लिहीली होती. तिच कविता त्यांनी पुन्हा चाहत्यांसह शेअर करत मनात दडलेल्या भावना पुन्हा व्यक्त केल्या.