'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:16 PM2023-10-17T13:16:39+5:302023-10-17T13:18:41+5:30

Aishwarya rai: 'बच्चन कुटुंबाची सून' म्हटलेलं ऐश्वर्याला जराही आवडत नाही हे फार कमी जणांना ठावूक आहे.

i-am-aishwarya-and-i-met-abhishek-when-the-actress-got-furious-on-being-called-the-daughter-in-law-of-bachchan-family | 'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया

'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया

बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya rai) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या सिनेमांपासून ते तिच्या फॅशनसेन्सपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगत आहे. अलिकडेच ऐश्वर्याने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केलं. तेव्हापासून तिच्या चर्चा कमालीच्या वाढल्या आहेत. ऐश्वर्या उत्तम अभिनेत्री असण्यासोबत अमिताभ बच्चन यांची सूनदेखील आहे. त्यामुळे आता तिला बच्चन कुटुंबाची सून हा टॅग मिळाला आहे. याविषयी अलिकडेच तिने तिचं मत मांडलं आहे. 

ऐश्वर्याने 2008 मध्ये 'NDTV हिंदी'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये बच्चन कुटुंबाची सून या मिळालेल्या टॅगविषयी तिने भाष्य केलं आहे. सोबतच माझी स्वतंत्र ओळख आहे असंही अधोरेखित केलं. "बच्चन आडनाव लावल्यानंतर ऐश्वर्या राय ही ओळख कुठे तरी दबली गेली आहे असं वाटतं का?" असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला होता. त्यावर, "हा प्रश्नच असा आहे ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. बच्चन कुटुंबाची सून हा टॅग लोकांनी दिला आहे. हे थोडं ड्रामेटिक वाटतं. मी ऐश्वर्या राय नावाची एक सर्वसामान्य मुलगी आहे, जिचं अभिषेक बच्चनसोबत लग्न झालं आहे. त्यामुळे आजही माझं नाव तेच आहे," असं ऐश्वर्या म्हणाली.

दरम्यान, ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास १६ वर्ष झाली आहेत. 'ढाई अक्षय प्रेम के' या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली ओळख झाली होती. त्यानंतर या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.

Web Title: i-am-aishwarya-and-i-met-abhishek-when-the-actress-got-furious-on-being-called-the-daughter-in-law-of-bachchan-family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.