'मी तिच्यासारखी सुंदर...', बागबान सिनेमानंतर अशी होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया, तर 'धर्मेंद्र...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 14:23 IST2023-07-16T14:22:12+5:302023-07-16T14:23:23+5:30

बागबान सिनेमात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली.

'I am beautiful like her...' was Jaya Bachchan's reaction after Baghbaan, while 'Dharmendra...' | 'मी तिच्यासारखी सुंदर...', बागबान सिनेमानंतर अशी होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया, तर 'धर्मेंद्र...'

'मी तिच्यासारखी सुंदर...', बागबान सिनेमानंतर अशी होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया, तर 'धर्मेंद्र...'

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा 'बागबान' (Baghban) सिनेमा सुपरहिट ठरला होताय सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये अमिताभ (Amitabh Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) दोघेही रोमँटिक अंदाजात दिसले. बायकोची समजूत घालणारे तिच्या सौंदर्याची तारीफ करणारे अमिताभ बच्चन यात दिसले. तर दोघांमधील सहन न होणारा दुरावाही सुरेख पद्धतीने चित्रित करण्यात आला होता. यात हेमा मालिनी यांचं सौंदर्य तरुणींनाही लाजवणारं होतं. 

रवी चोपडा दिग्दर्शित 'बागबान' हा एक फॅमिली ड्रामा होता. यामध्ये अनेक कलाकार होते. वृद्धापकाळात आई वडिलांकडे मुलांचं कसं दुर्लक्ष होतं हे सिनेमातून उत्तमरित्या मांडण्यात आलं. केवळ १० कोटी बजेट असलेल्या सिनेमाने ४३ कोटींहून अधिक कमाई केली होती. ही फिल्म अनेक कलाकारांसाठी करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरली.

जया बच्चन काय म्हणाल्या?

हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती. हेमा मालिनी यांच्या जागी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी सिनेमात असायला हवं होतं का? या प्रश्नावर जया बच्चन एका मुलाखतीत म्हणाल्या, 'मला असं वाटत नाही. कारण हेमाजींची भूमिका जबरदस्त आहे. इतकी सुंदर तर मी दिसू शकत नाही.' यावर जया बच्चन यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 'तुम्हाला हेमाजींना पाहून इर्षा वाटली का?' यावर जया बच्चन म्हणाल्या,'इर्षा तर नाही वाटली कारण मी अभिनयाबाबतीत नाही बोलले तर सौंदर्याबाबतीत बोलले.'

धर्मेंद्र यांनी सिनेमा पाहिला का?

हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हसतच उत्तर दिले की 'मला याबद्दल माहित नाही.' बागबान सिनेमा सलमान खानचीही छोटी भूमिका होती. त्याच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं होतं.

Web Title: 'I am beautiful like her...' was Jaya Bachchan's reaction after Baghbaan, while 'Dharmendra...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.