मला धमक्यांचे फोन येत आहेत, सलमान खानच्या वकीलाचा दावा! सरकारी वकील म्हणतात, हा ‘पब्लिसिटी स्टंट’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 06:59 AM2018-04-06T06:59:24+5:302018-04-06T12:29:24+5:30

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावताच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कालची ...

I am getting calls from threats, Salman Khan's lawyer claims! Public prosecutor says, 'Publicity stunt' !! | मला धमक्यांचे फोन येत आहेत, सलमान खानच्या वकीलाचा दावा! सरकारी वकील म्हणतात, हा ‘पब्लिसिटी स्टंट’!!

मला धमक्यांचे फोन येत आहेत, सलमान खानच्या वकीलाचा दावा! सरकारी वकील म्हणतात, हा ‘पब्लिसिटी स्टंट’!!

googlenewsNext
ळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावताच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कालची रात्र सलमानने तुरूंगात घालवली.  एकीकडे सलमान तुंरुगात आपल्या बराकीत रवाना झाला आणि दुसरीकडे बिश्नोई समाजाच्या लोकांनी  आतीषबाजी केली. याचदरम्यान सलमानचे वकील महेश बोरा यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा केला. मला धमकीचे मॅसेज व फोन येत आहेत.सलमानची केस लढू नकोस, यासाठी मला धमक्या येत आहेत. मात्र या धमक्यांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. मी सलमानची केस लढवणार, असे त्यांनी शुक्रवारी सकाळी मीडियाशी बोलतांना स्पष्ट केले.
अर्थात सरकारी वकीलांनी मात्र सलमानच्या वकीलांचा हा दावा निव्वळ ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे म्हटले.



ALSO READ : काय म्हणून बाकी आरोपी सुटलेत अन् सलमान खानला मिळाली शिक्षा?

  न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर कालची अख्खी रात्र सलमानने अस्वस्थेत काढली. सत्र न्यायालयाने जामिनावरील सुनावणी उद्या शनिवारपर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची दुसरी रात्रही तुरुंगात काढावी लागणार आहे. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पहिल्या रात्री त्याने जेवणही केले नाही.  रात्री त्याना वरण-भात, कोबीची भाजी आणि चपाती दिली गेली. मात्र त्याने जेवणास नकार दिला. रात्री १२ वाजेपर्यंत सलमान त्याच्या बराकीबाहेर टेहळत होता.  यानंतर तो झोपायला बराकीत गेला. आज सकाळी ६.३० वाजता सलमान उठला. उठल्यावर त्याला सकाळची न्याहारी देण्यात आली. पण त्याला ती आवडली नाही. मग त्याने तुरुंगातील कॅन्टिनमधून स्वत:साठी ब्रेड  आणि दूध मागवले. सलमानच्या कुटुंबानी कालच या कॅन्टिनमध्ये ४०० रूपये जमा केले होते. जेणे करून सलमान त्याच्या आवडीच्या वस्तू येथून घेऊ शकेल. तुरुंगातील कपडे घालण्यास सलमानने नकार दिला. कालच्याच कपड्यात त्याने अख्खी रात्र काढली.काल कोठडीत आल्यानंतर सलमानची आरोग्य तपासणी केली असता त्याचा रक्तदाब वाढला होता. मात्र काही तासात तो सामान्य झाला.

Web Title: I am getting calls from threats, Salman Khan's lawyer claims! Public prosecutor says, 'Publicity stunt' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.