"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:15 IST2025-01-04T09:09:48+5:302025-01-04T09:15:09+5:30
श्रीदेवी (Sridevi) ही बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आहे, जिने दक्षिणेतील दिग्गजांसोबतही काम केले आणि तिथल्या निर्मात्यांचीही ती पहिली पसंती राहिली होती. दरम्यान नुकतेच राम गोपाल वर्मा यांनी जान्हवी कपूरबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे.

"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम
श्रीदेवी (Sridevi) ही बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आहे, जिने दक्षिणेतील दिग्गजांसोबतही काम केले आणि तिथल्या निर्मात्यांचीही ती पहिली पसंती राहिली होती. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्माते आहेत, जे ती जगातून गेल्यानंतरही तिच्या अभिनयाचे कौतुक करताना थकत नाहीत. तिचे चित्रपट चाहत्यांना खूप आवडतात. 'चांदनी', 'प्रेमरोग', 'जुदाई', 'मिस्टर इंडिया', 'कुछ सच कुछ झूठा', 'आर्मी' असे अनेक चित्रपट आहेत, जे पाहून आजही चाहते तिच्या आठवणीत हरवून जातात. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर(Janhavi Kapoor)ची अनेकदा तिच्याशी तुलना केली जाते. नुकतेच एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले की, लोक असे म्हणत असले तरी, जान्हवी कपूरमध्ये त्याला अद्याप आईसारखे काही दिसले नाही. तसेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मला जान्हवीसोबत काम करायचे नाही. हे दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma).
'रंगीला', 'सत्या', 'कंपनी' आणि 'भूत' सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्ते शैली आणि धारदार विधानांमुळे चर्चेत राहतात. अलीकडेच, राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत दिवंगत हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी तिची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल आपले मत शेअर केले. जान्हवी कपूरचा 'देवरा' को-स्टार ज्युनियर एनटीआरने सांगितले होते की, चित्रपटाच्या फोटोशूटदरम्यान एका फ्रेममध्ये जान्हवी ही तिच्या आईची हुबेहुब कॉपी आहे असे त्याला वाटले. तथापि, आरजीव्हीने ही तुलना नाकारली आणि त्याला 'श्रीदेवीचा हँगओव्हर' म्हटले.
'मला मुलगी नाही तर आई आवडते'
'मला आई आवडली, मुलगी नाही' श्रीदेवीच्या अभिनयाचे कौतुक करताना ते म्हणाले की, 'पडहारेल्ला वायासू' असो किंवा 'वसंत कोकिला', तिच्या अभिनयाने मला प्रेक्षक म्हणून खिळवून ठेवले, मी चित्रपट निर्माता आहे हे मी विसरलो. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जान्हवी कपूरसोबत काम करणार का? तर ते म्हणाले, 'मला मुलगी नाही तर आई आवडते'. मात्र, आपण हे कोणत्याही वाईट हेतूने बोलत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, 'माझ्या करिअरमध्ये असे अनेक मोठे स्टार्स होते ज्यांच्याशी माझा संबंध नव्हता, त्यामुळे जान्हवी कपूरसोबत चित्रपट करण्याचा माझा कोणताही विचार नाही.'
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राम गोपाल वर्मा त्याच्या 'सत्या' स्टार मनोज बाजपेयीसोबत एका चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. तिथेच. दुसरीकडे, नुकतीच 'देवरा'मध्ये दिसलेली जान्हवी कपूर लवकरच 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' आणि 'परम सुंदरी' यांसारख्या चित्रपटांसह भेटीला येणार आहे.