"मला त्या दोघांसाठी...", आमिर खानच्या गर्लफ्रेंडवर बहीण निखतने दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:49 IST2025-03-15T12:48:43+5:302025-03-15T12:49:00+5:30
, Aamir Khan :बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याने त्याचा ६०वा वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी त्याने पत्रकारांना त्याची नवीन गर्लफ्रेंड गौरीला भेटवले.

"मला त्या दोघांसाठी...", आमिर खानच्या गर्लफ्रेंडवर बहीण निखतने दिली प्रतिक्रिया
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याने त्याचा ६०वा वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी त्याने पत्रकारांना त्याची नवीन गर्लफ्रेंड गौरीला भेटवले. दरम्यान आता सुपरस्टारची बहीण निखत खान(Nikhat Khan)ने त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याची गर्लफ्रेंड गौरीबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. आमिरसोबत व्यतित केलेले बालपण आणि स्टारडमपर्यंतचा प्रवास यावरही त्याने मत व्यक्त केले.
निखतने गौरी आणि भाऊ आमिरच्या नातेसंबंधावर ईटाईम्सला सांगितले की, 'मी त्या दोघांसाठी खूप खूश आहे आणि नेहमी त्यांच्या चांगल्याची आशा आहे. आमिर ६० वर्षांचा झाला यावर विश्वास बसत नाही. आपल्या सगळ्यांची वयं पण वाढली. साहजिकच तेही मोठे होत आहेत. पण, जेव्हा आपण मागे वळून पाहते तेव्हा अनेक अप्रतिम आठवणी समोर येतात.
निखत पुढे म्हणाली की, 'मला तो दिवस आठवतो जेव्हा आमिर आणि फैजल युनिफॉर्ममध्ये शाळेत जायचे. लवकर उठून शाळेत जायचे. एके दिवशी अम्मा म्हणाली की, घरी गाडी असल्याने त्यांनी गाडीने शाळेत जावे. पप्पा शाळेला जाण्यासाठी मैल पायपीट करायचे, त्यामुळे त्यांच्या मुलांनीही असेच करावे अशी त्यांची इच्छा होती.' निखतने म्हणाली की, 'बालपणी आमिर जिद्दी होता. मला आठवतं की आम्ही गाडी चालवायला शिकत होतो. मोकळी गाडी दिसली की आम्हाला ती चालवायची असायची. आधी कोण गाडी चालवणार अशी आमच्यात स्पर्धा असायची. आमिर हुशार होता. त्याला चावी मिळाली, तर मला ड्रायव्हरची सीट मिळाली. आम्ही २०-३० मिनिटे बसून राहिलो. आमिर ठाम राहिला आणि ड्रायव्हर संयमसोबत बसून राहिला.' अखेर निखतने हार मानली आणि ड्रायव्हरची सीट आमिरला दिली.
आमिर खानचे स्टारडम
निखत पुन्हा म्हणाला, 'आमिरच्या करिअरच्या सुरुवातीला चाहत्यांचे फोन आम्हाला रोमांचित करायचे. ती खूप छान भावना होती. आम्हाला आमच्या भावाचा अभिमान होता. पण जसजसे कॉल्स वाढले, विशेषतः रात्री उशिरा, आम्हाला काळजी वाटू लागली. संपूर्ण घर जागं व्हायचं. प्रवास अप्रतिम होता. मी माझ्या हृदयावर हात ठेवून म्हणते की भाऊ असावा तर असा. आमिर, तुझा खूप अभिमान आहे. आमिर खान आता 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा मागील 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.