"मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केलंय..", नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:24 AM2024-02-19T09:24:29+5:302024-02-19T09:25:04+5:30
बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. दरम्यान नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडमधील सध्याच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली.
बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांनी बॉलिवूडचे चढउतार पाहिले आहेत आणि म्हणूनच, बॉलिवूडमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांचे मत खूप महत्त्वाचे आहे. मात्र, एका मुलाखतीत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सद्याच्या स्थितीवर ते निराश आहेत. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, त्यांनी हिंदी सिनेमा पाहणे बंद केले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो. पण त्यांच्या मते चित्रपट निर्माते एक सारखेच चित्रपट बनवत आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नसीरुद्दीन शाह म्हणाले की, हे मला निराश करते. मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे, मला ते अजिबात आवडत नाहीत.
'...कारण त्यात दम नाही'
नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की, जगभरात हिंदी चित्रपट पाहिले जातात कारण भारतीयांना त्यांच्या मूळ आणि त्यांच्या मातृभूमीशी कनेक्ट करतात. पण जर या गतीने आणि अशा रीतीने गोष्टी चालू राहिल्या तर लवकरच सर्वांना कंटाळा येईल. ते म्हणाले, 'भारतीय पदार्थ सर्वत्र आवडतात कारण त्यात दम आहे. हिंदी चित्रपटांत दम आहे का? होय, त्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. किती परदेशी, किती भारतीय, किती रंगीत. लवकरच त्यांना त्याचा कंटाळा येईल कारण त्यात काही दम नाही.
'आता खूप उशीर झालाय'
निर्मात्यांनी त्यांना पैसे कमवण्याचे साधन मानणे बंद केले तरच हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलं काही होऊ शकेल अशी आशा आहे, असे नसीर यांना वाटते. मात्र, आता खूप उशीर झाला असून त्यावर उपाय नसल्याचेही त्यांना वाटते. त्याच्या दाव्यांचे समर्थन करताना,ते म्हणाले की, 'कारण ज्या चित्रपटांना हजारो लोक पाहत आहेत, ते बनतच राहतील आणि देव जाणो लोक किती काळ ते पाहत राहतील. त्यामुळे ज्यांना गंभीर चित्रपट बनवायचे आहेत, त्यांच्यावर आजचे वास्तव दाखवून देण्याची जबाबदारी आहे आणि अशाप्रकारे बनवावे लागतीत की त्यांना कोणताही फतवा मिळणार नाही किंवा ईडीची धाड पडणार नाही.
वर्कफ्रंट..
नसीररुद्दीन शाह यांनी अनेक भाषांमध्ये शंभरहून अधिक चित्रपट केले आहेत. 'उमराव जान', 'जाने भी दो यारो', 'हीरो हिरालाल', 'कभी हां कभी ना', 'ओमकारा', 'ए वेनस्डे!', 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटांचा समावेश आहे. 'युं होता तो क्या होता' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.