'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 07:35 PM2023-08-22T19:35:00+5:302023-08-22T19:35:39+5:30

Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा 'अकेली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने चित्रपट, त्याची व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील इस्रायली स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

I never thought that I will work in a movie like 'Akeli', Nusrat Bharuch expressed his feelings | 'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

googlenewsNext

अभिनेत्री नुसरत भरुचा(Nushrratt Bharuccha)ला 'अकेली' सारखा चित्रपट करू शकेल असे वाटले नव्हते. 'अकेली' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने चित्रपट, त्याची व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील इस्रायली स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभवाविषयी बोलताना नुसरत म्हणाली, "खरे सांगू, मी असा चित्रपट करू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते. पण हो, मी ते केले आहे. कधी कधी, जेव्हा मी स्वत:ला यात पाहते. तेव्हा मला वाटते की मी ते कसे केले. हे अविश्वसनीय वाटत आहे, परंतु मी हा चित्रपट केला याचा मला आनंद आहे."

नुसरत भरुचा 'अकेली' चित्रपटात ज्योतीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटाबद्दल म्हणाली की, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला माहित नव्हते की मी इतका अभिनय करू शकते. मी वेगवेगळ्या भूमिका करू शकते हे मला कधीच माहीत नव्हते. मला जे काही दिले गेले त्यापासून मी सुरुवात केली, पात्रे वाचून त्याचा आनंद घेतला आणि ते वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. मग मला दुसरी स्क्रिप्ट मिळाली. मी प्रयत्न केले आणि काहीतरी साध्य केले. जेव्हा मी ते साध्य करू शकत नाही असे वाटले तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकाचा सल्ला घेतला.

नुसरतने साकारली ज्योतीची भूमिका
पुढे नुसरत म्हणाली, "चित्रपटात मी ज्योतीची भूमिका साकारत आहे जी अमृतसरची एक अतिशय साधी मुलगी आहे. ती तिच्या आई आणि पुतण्यासोबत राहते. तिला भारताबाहेर नोकरी मिळते. तिच्या कुटुंबाला आधार देत, ती शांतता नसलेल्या देशात राहते. इराकमध्ये पोहोचताच तिथे ISIS कडून हल्ला होतो. ही कथा त्या कठीण काळात तिच्या जगण्याची आणि ती तिच्या देशात कशी परत येते, यावर आधारीत आहे.

नुसरतने या चित्रपटात इस्त्रायली कलाकारांसोबत काम केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली, "हा एक अप्रतिम अनुभव होता. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या भाषा, संस्कृतीतील कलाकारांसोबत काम करता तेव्हा त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते. त्यांच्याकडे शूटिंगचे वेगवेगळे तंत्र असतात, तुम्ही ते कसे शिकता. एकाच दृश्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी पाहणे, ते त्यांचे तर्क कसे लागू करतात आणि नंतर परफॉर्म करतात. हे खूप मजेशीर आहे."
 'अकेली' हा चित्रपट प्रणय मेश्राम दिग्दर्शित थ्रिलर ड्रामा असून त्यात नुसरत मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Web Title: I never thought that I will work in a movie like 'Akeli', Nusrat Bharuch expressed his feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.