"मी आमिर खानचा वापर केला..", एक्स पतीबद्दल किरण रावनं केलेलं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 05:47 PM2024-02-29T17:47:36+5:302024-02-29T17:48:11+5:30

Aamir Khan And Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण राव सध्या तिच्या आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. दोघेही सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.

"I used Aamir Khan...", Kiran Rao's statement about ex-husband is in discussion | "मी आमिर खानचा वापर केला..", एक्स पतीबद्दल किरण रावनं केलेलं वक्तव्य चर्चेत

"मी आमिर खानचा वापर केला..", एक्स पतीबद्दल किरण रावनं केलेलं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan)ची एक्स पत्नी किरण राव (Kiran Rao) सध्या तिच्या आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. दोघेही सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच किरण रावने कबूल केले की तिने आमिर खानचा वापर केला आहे.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत किरण रावने आमिर खानबद्दल बरंच काही सांगितलं. जेव्हा तिला विचारण्यात आले की आमिर खानने तिला सर्वत्र पाठिंबा दिला आहे आणि त्याने स्टेप बाय स्टेप चित्रपटाचे प्रमोशनही केले आहे. तुला त्याच्याकडून खूप मदत मिळाली असेल ना? यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'अर्थात मी त्याचा पुरेपूर वापर केला आहे.'

त्याला न घाबरता त्याचा वापर करुन घेते

किरण राव पुढे म्हणाली की, 'त्याच्या स्टार पॉवरचा जितका वापर करता येईल तितका व्हायला हवा होता. मी त्याला म्हणायचे की तुम्ही इथे उभे असाल तर फोटो द्या. मी सर्वांना सांगते की १ मार्चला एक चित्रपट येत आहे जो आमिर खानने बनवला आहे. जो १ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मी त्याला न घाबरता त्याचा वापर करुन घेते.

आमिर खान आणि किरण राव २०२१ साली झाले वेगळे

आमिर खान आणि किरण राव यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. दोघांनाही वेगळे होऊन तीन वर्षे झाली असली तरी आजही दोघेही एकमेकांना उघडपणे साथ देतात. काही दिवसांपूर्वी आमिर खानची मुलगी इरा खानचे लग्न पार पडले. ज्यामध्ये किरण राव देखील सहभागी झाली होती. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये ते सहभागी झाले. याशिवाय किरण राव आणि आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता यांचेही चांगले नाते आहे. रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर ३ वर्षांनी आमिर खानने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केले. दोघांनाही आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नाच्या १५ वर्षानंतर घटस्फोट झाला. मात्र, आजही दोघांमध्ये चांगले संबंध आहेत.

Web Title: "I used Aamir Khan...", Kiran Rao's statement about ex-husband is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.