"त्यावेळी राग यायचा, पण...", 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:04 IST2025-02-10T10:03:00+5:302025-02-10T10:04:42+5:30
Actress Mandakini : 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाचं नाव कानावर पडलं तर डोळ्यासमोर येतो तो अभिनेत्री मंदाकिनीची चेहरा. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय आणि रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे.

"त्यावेळी राग यायचा, पण...", 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीने व्यक्त केली खंत
'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili Ho Gayi) या चित्रपटाचं नाव कानावर पडलं तर डोळ्यासमोर येतो तो अभिनेत्री मंदाकिनी(Actress Mandakini)ची चेहरा. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय आणि रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे. पण तरीदेखील आजही ती राज कपूर यांच्या गंगा या भूमिकेसाठी लोक तिची अजूनही आठवण काढतात. मंदाकिनी ८०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी सगळ्यांना तिच्यासोबत काम करायचं होतं, पण आजच्यासारखी हिरोइन्सची वेळ त्यावेळी नव्हती. आज प्रत्येक अभिनेत्री आणि अभिनेत्यासोबत एक मोठी टीम काम करते. ते व्हॅनिटीमध्ये कपडे बदलतात आणि विश्रांती घेतात. पण ८०-९०च्या दशकात तसे नव्हते. मंदाकिनी नुकतीच 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये आली तेव्हा तिने याबद्दल सांगितले.
खरेतर होस्ट हर्ष लिंबाचिया याने शोची जज मलायका अरोराला विचारले होते की, हल्ली जेव्हा आपण हिरोईन पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची टीम असते. मलायका मॅडम, तुमच्यासोबत किती लोक येतात. याला उत्तर देताना मलायका म्हणाली, 'यावर चर्चा करू नका. मग मंदाकिनी म्हणाली, 'आम्ही ड्रेस कसे बदलत होतो? जर तुम्ही स्टुडिओमध्ये असाल, तर एक मेकअप रूम आहे जेथे तुम्ही तुमचा ड्रेस बदलू शकता. पण तुम्ही बाहेर शूट करात असाल तेव्हा कसे कपडे बदलत असू याची कल्पना करा.
मंदाकिनी पुढे म्हणाली, 'कधी कधी मला कोणालातरी विनंती करावी लागत होती. जर कोणाचे घर जवळ असेल तर मी त्यांना विचारायचे की मला तुमची खोली मिळेल का? मग आम्ही त्याची खोली घ्यायचो. कधी-कधी चार-पाच जण तिथे उभे राहून सर्व पडद्याने झाकायचे आणि मध्येच आम्ही ड्रेस बदलायचो. त्यावेळी मला राग यायचा, थोडं वाईट वाटायचं, पण सगळे तेच करत होते.
मंदाकिनी का झाली कलाविश्वातून गायब?
मंदाकिनीने १९८५ मध्ये 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मंदाकिनी रातोरात स्टार बनली. यानंतर तिने आणखी काही चित्रपट केले, पण नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. याबाबत विचारले असता मंदाकिनीने सांगितले की, तिने अनेक चित्रपट साइन केले होते. तिने एका चित्रपटाचे १० दिवस शूटिंगही केले होते, पण त्यांचा दिग्दर्शक अचानक गायब झाला. त्याचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र तो सापडला नाही.
मंदाकिनीचा शेवटचा चित्रपट
मंदाकिनीचा शेवटचा चित्रपट १९९६ मध्ये आला होता. तिने १९९० साली डॉ. काग्युर टी रिनपोचे ठाकूर यांच्याशी विवाह केला, जे नंतर बौद्ध भिक्षू बनले. मंदाकिनी आणि त्यांचे पती तिबेटी हर्बल सेंटर चालवतात आणि त्यांना दोन मुले आहेत. मंदाकिनी गेल्या २९ वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.