'मला कायम पुरुष भुमिकांसाठीच ऑफर मिळायची'; नीना गुप्ता यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 02:48 PM2023-11-23T14:48:46+5:302023-11-23T14:49:33+5:30

Neena gupta: मला स्त्री पात्राची भूमिका कराविशी वाटायची पण...

I was always offered male roles bollywood actress Neena Gupta expressed regret | 'मला कायम पुरुष भुमिकांसाठीच ऑफर मिळायची'; नीना गुप्ता यांनी व्यक्त केली खंत

'मला कायम पुरुष भुमिकांसाठीच ऑफर मिळायची'; नीना गुप्ता यांनी व्यक्त केली खंत

प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेखील बेधडकपणे व्यक्त होणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (neena gupta).  काही काळापूर्वीच नीना गुप्ता यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक गुपितं उघड केली. त्यामुळे मध्यंतरी त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यामध्येच सध्या त्यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळात मला पुरुषी भूमिका ऑफर व्हायच्या असं सांगितलं.

बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणाऱ्या नीना गुप्ता यांना सुरुवातीला केवळ नाटक करण्यातच स्वारस्य होतं. त्यामुळे आपण कायम थिएटरशी जोडून रहावं असं त्यांना वाटायचं. कॉलेजमध्ये असतानाही त्या कायम नाटकांमध्ये काम करायच्या. परंतु, कॉलेजमध्ये त्यांना दरवेळी पुरुष पात्राचं साकारायला मिळायचं. यामुळे कायम त्यांचा हिरमोड व्हायचा.

"कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या ग्रुपमध्ये मी एकटीच सगळ्या मुलींमध्ये उंच होते. त्यामुळे मला कायम पुरुषी भूमिका मिळायच्या. मला त्यावेळी सतत स्त्री पात्र साकारावसं वाटायचं पण ते कधीच मिळायचं नाही. आणि, मला स्त्री भूमिका हवीये हे मी कधी दिग्दर्शकांना सांगू सुद्धा शकले नाही.  त्यामुळे मी कायम घरी नायिकेच्या डायलॉग्जशी रिहर्सल करायचे", असं नीना गुप्ता म्हणाल्या.

दरम्यान, नीना गुप्ता आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यात सगळ्यात जास्त चर्चिलं गेलं. त्यांच्या जीवनातील या चढउतारांविषयी त्यांनी सविस्तरपणे त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
 

Web Title: I was always offered male roles bollywood actress Neena Gupta expressed regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.