'माझा जन्म महाराष्ट्रातलाच...', विलासराव देशमुख यांच्या सूनबाईंचं मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 05:13 PM2022-10-28T17:13:56+5:302022-10-28T17:14:54+5:30
Riteish Deshmukh and Genelia D'souza Deshmukh : तब्बल १० वर्षानंतर रितेश आणि जेनेलिया देशमुख एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D'souza Deshmukh) हे बी टाऊनचे सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर दोघांच्या फनी रील व्हिडिओंचा बोलबाला आहे. रियल लाईफ कपल रितेश आणि जेनेलिया आता १० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी या जोडप्याचे चाहते उत्सुक आहेत.
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. पण आता हे रिअल लाईफ कपल एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. होय, रितेश आणि जेनेलिया १० वर्षांनंतर मराठी चित्रपट वेडमध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
जेनेलिया देशमुखने ट्विटरवर वेड चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, माझा जन्म महाराष्ट्रातलाच. मी अभिनयाला सुरुवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले. तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
माझा जन्म महाराष्ट्रातलाच.मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले.तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. pic.twitter.com/bT4bGA4VuE
— Genelia Deshmukh (@geneliad) October 26, 2022
या चित्रपटाबद्दल रितेश देशमुख म्हणाला की, मी नर्व्हस होतो. तरीही थोडा नर्व्हस होतो. जेनेलिया आणि मी काही काळापासून काम करत आहोत. आणि आता ते रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला वाटतं शुभ दिवाळी पाडवा हा पहिला लूक दाखवण्याची योग्य वेळ होती. आम्ही यावर खूप मेहनत घेतली आहे. सर्वांना ते आवडेल अशी आशा आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख शेवटचे २०१२ साली तेरे नाल लव्ह हो गयामध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर आता ते वेड चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
वेड या चित्रपटातून मराठी अभिनयात पदार्पण करणारी जेनेलिया देशमुख या चित्रपटाची निर्मातीही आहे. या चित्रपटात जिया शंकर आणि अशोक सराफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, हा असा चित्रपट आहे ज्यात लोकप्रिय अजय आणि अतुल यांनी चित्रपटाचे संगीत दिले आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.