मी माझ्या भूमिकेत जिवंत राहीन - के.के.मेनन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 10:42 AM2017-11-29T10:42:56+5:302017-11-29T16:12:56+5:30

शमा भगत के.के.मेनन हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो स्वत:चे नशीब स्वत:च लिहितो. झी टीव्हीवरील केतन मेहता दिग्दर्शित ‘प्रधानमंत्री’ ...

I will live in my role - KK Menon | मी माझ्या भूमिकेत जिवंत राहीन - के.के.मेनन

मी माझ्या भूमिकेत जिवंत राहीन - के.के.मेनन

googlenewsNext
ong>शमा भगत

के.के.मेनन हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो स्वत:चे नशीब स्वत:च लिहितो. झी टीव्हीवरील केतन मेहता दिग्दर्शित ‘प्रधानमंत्री’ या मालिकेत पंतप्रधानाची भूमिका साकारल्यानंतर के.के.मेनन हे नाव सर्वांसाठी ओळखीचं बनलं. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता असं ठरवलंय की, तो लहान काम करण्यासाठी नव्हे तर काहीतरी अत्युच्च उंचीचं काम करण्यासाठी जन्माला आला आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांच्यासोबत मारलेल्या या गप्पा...

* सध्या कोणत्या आगामी प्रोजेक्टवर काम सुरू आहे?
- ‘व्होडका डायरिज’ आणि ‘फेमस’ हे दोन चित्रपट माझे प्रदर्शनासाठी तयार आहेत. ‘व्होडका डायरीज’मध्ये मी एका संशोधकाच्या भूमिकेत दिसणार असून तो सतत मानसिकदृष्ट्या रंगवलेल्या स्वप्नात रममाण असतो. यात माझ्यासोबत जिमी शेरगील, श्रिया सरन, पंकज त्रिपाठी असणार आहेत. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात डेब्यू करणारे दिग्दर्शक कुणाल हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

* तुम्ही तुम्हाला मिळालेल्या भूमिकांबद्दल समाधानी आहात काय?
- मला समाधानाविषयी माहिती नाही, पण असे बरेच जण आहेत ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी लहान काम करणं थांबवलं आहे, कारण मला असं वाटतं आहे की, मला आता काहीतरी वेगळ्या दृष्टीकोनातील भूमिका करायला हव्यात. मी ‘व्होडका डायरीज’ आणि ‘सॅन ७५’ मध्ये जे काम केलं आहे ते मला नक्कीच आवडलेलं आहे. 

* तुम्हाला असं वाटतं का, तुमच्यातील क्षमतांना अजून वाव मिळाला नाही?
- मी माझ्यातील क्षमतांना चांगलेच ओळखतो. माझ्या अस्त्विापर्यंत माझ्यातील क्षमता कायम राहतील. मी माझ्यातील क्षमतांच्या पुढे जाऊन काम करू इच्छितो. ती खरंतर माझी स्वत:ची जबाबदारी आहे. मी अजून जास्त भूमिका करायला हव्यात आणि एक कलाकार म्हणून मी अजून समृद्ध व्हायला हवं. आणि  एक कलाकार त्याच्या कामाने कधीच समाधानी असतं नाही.

* थिएटरविषयी काय सांगाल?
- मी थिएटरला नोकरी समजून करू शकत नाही. थिएटरचा एक काळ असतो त्याच काळात ते करणं अपेक्षित आहे. मी सतत काम करत आहे आणि थिएटरसाठी माझा वेळ देऊ शकत नाहीये. मी काही मोठा स्टार नाही जेणेकरून प्रेक्षकांनी माझ्यासाठी वाट पाहावी. 

*  वेबसीरिज करण्याचा काही विचार आहे का?
- मी काही वेबसीरिजला होकार दिला आहे आणि काही नाकारल्याही आहेत. मला वाटतं की, भूमिकांना न्याय मिळत नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मला एवढं कळालं आहे की,  मुख्य कलाकार म्हणून काम मिळालं नसेल तर मला तशा प्रकारचं काम कधीही आॅफर होत नाही. वेबसीरिजला स्टार्सची गरज नाही. मी स्वत:ला सिद्ध केलं आहे. 

* तरूण दिग्दर्शक चांगल्या कथानकासह बॉलिवूडमध्ये येत आहेत, काय वाटते याविषयी?
- नक्कीच, हे खरंय. मात्र, सध्या इंडस्ट्रीत संधी आणि टॅलेंटची कमतरता आहे. मी देखील अनेक वेगळया विषयांवरील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गोविंद निहलानी, श्याम बेनेगल आणि सई परांजपे यांसारख्या दिग्दर्शकांसोबत मी ही काम केलं आहे. दिग्दर्शकांच्या नव्या कन्सेप्टवर आधारित चित्रपट येऊ पाहत आहेत तर ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. 

* तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? आयुष्यातील उतार-चढावाबद्दल काय सांगाल?
- चिमूटभर मीठाप्रमाणे मी माझ्या चढ-उताराला मानतो. प्रत्येक जण या प्रसंगातून जात असतो. तुम्ही या चढउताराला काही वर्षांनंतर आठवाल, तर तुम्हाला आज मिळालेल्या यशाची किंमत नक्कीच कळेल. लोक जर माझं माझ्या कामावरून कौतुक करत असतील, तर मला ते लोक खरंच आवडत नाहीत. मला कोणतंही काम मनापासून करायला आवडतं. मग ते करत असताना मी कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. 

* तुम्हाला रोमँटिक अंदाजात आम्ही केव्हा पाहू शकू?
- मी कधीच चित्रपटांचे वर्गीकरण करत नाही. मी मानवी भूमिका साकारतो. प्रत्येक माणसाला दु:ख, भीती आणि राग हा असतो. बऱ्याचदा असं होतं, गंभीर भूमिकांमध्येही काही साधारण कॅरेक्टर्स असतात. मी ‘हनिमून’ आणि ‘संकट सिटी’ या चित्रपटात रोमँटिक अंदाजात दिसलो आहे. मी भूमिकांसाठी काहीही करू शकतो.

Web Title: I will live in my role - KK Menon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.