प्रेम म्हणजे निव्वळ मूर्खपणा,आयुष्यभर एकटेच राहणे पसंत करेन,कॅमेरासमोर रियाने मांडले होते तिचे विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:27 PM2020-08-22T13:27:04+5:302020-08-22T13:32:53+5:30
सुशांतच गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असली तरी तिच्या बाबतीतही अनेक गोष्टी समोर येत आहेत.
प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडतोच. कधी हे प्रेम व्यक्त होतं, तर कधी आयुष्यभर अव्यक्तचं राहतं, पण काहीही असलं तरी प्रत्येकाची एक लव्हस्टोरी असतेच.बॉलिवूडमध्ये अशी एक लव्हस्टोरी सुशांतसाठी मर्डर मिस्ट्री कधी बनली हे अख्या जगासमोर पडलेले कोडं आहे. दिवसेंदिवस सुशांत मृत्यूप्रकरणी नव नवीन खुलासे होतायेत.रोज धक्कादायक माहिती समोर यात या मर्डर मिस्ट्रीत मध्ये मारेकरी कोण याचा तपास सुरू आहे. तुर्तास सुशांतच गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असली तरी तिच्या बाबतीतही अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष म्हणजे रिया सुशांतसह लिव्ह इनमध्ये राहत होती. रियाचे सुशांतवर प्रेम होते. अशा सगळ्या गोष्टी समोर येत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडाही होतोय.
मुळात रियाने दिलेल्या एका मीडिया मुलाखतीमध्ये तिच्यासाठी प्रेम काय आहे? याबाबत सांगताना तिने सांगितले होते की, प्रेमाबद्दलचा माझा दृष्टीकोण आता पूर्णपणे वेगळा आहे. कदाचित प्रेम वगैर या जाळ्यात न अडकता आयुष्यभर मी एकटीच राहाणं पसंत करेन असे सांगताना दिसते. याच व्हिडीओमध्ये प्रेमात दीड वर्षानंतर लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतात. प्रेमात लोक काही महिन्यानंतर बदलून जातात अशा आशयाचे विचार या व्हिडीओमध्ये रियाने मांडले आहेत.
सुशांतचा मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अश्रु अनावर झाले होते आणि तिने सुशांतची माफी मागितली होती अशी नवीन माहिती समोर आली आहे. कपूर रुग्णालयातील कर्मचारी सुरजीत सिं ह राठोड याने ही माहिती दिल्याचं ‘एबीपी न्युज’च्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच रियाला ताब्यात घेतलं जाऊ शकते. व्यावसायिक वैर देखील तपासले जाईल.माहिती समोर आली आहे.