इंडियन गर्लच्या भूमिकेत कंगणाला बघायला आवडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2016 09:49 AM2016-10-10T09:49:27+5:302016-10-15T18:48:23+5:30
प्रियांका लोंढे चेतन भगत या तरुण लेखकाने आजच्या तरुणाईवर गारूड केले आहे. पहिल्याच पुस्तकाने मिळवून दिलेली लोकप्रियता आणि बेस्ट ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> प्रियांका लोंढे
चेतन भगत या तरुण लेखकाने आजच्या तरुणाईवर गारूड केले आहे. पहिल्याच पुस्तकाने मिळवून दिलेली लोकप्रियता आणि बेस्ट सेलरची पदवी मिरवत या लेखकाची घोडदौड सुरुच अहे. तरुण मुले आजही चेतन भगतच्या पुस्तकाची चातकासारखी वाट पाहत असतात. चेतनने त्याच्या आगामी चित्रपट आणि पुस्तकाविषयी लोकमत सीएनएक्सला छान मुलाखत दिली. यावेळी चेतन अतिशय मस्त मुडमध्ये होता. हसत-खेळत झालेल्या या मुलाखतीत चेतनने दिलखुलास गप्पा मारल्या...
चेतन भगत या तरुण लेखकाने आजच्या तरुणाईवर गारूड केले आहे. पहिल्याच पुस्तकाने मिळवून दिलेली लोकप्रियता आणि बेस्ट सेलरची पदवी मिरवत या लेखकाची घोडदौड सुरुच अहे. तरुण मुले आजही चेतन भगतच्या पुस्तकाची चातकासारखी वाट पाहत असतात. चेतनने त्याच्या आगामी चित्रपट आणि पुस्तकाविषयी लोकमत सीएनएक्सला छान मुलाखत दिली. यावेळी चेतन अतिशय मस्त मुडमध्ये होता. हसत-खेळत झालेल्या या मुलाखतीत चेतनने दिलखुलास गप्पा मारल्या...
वन इंडियन गर्ल पुस्तकाबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे, या कथेवर चित्रपट आला तर त्यात कंगणा दिसणार का ?
-: कंगणा बॉलिवूडमधील सध्या टॉपची अभिनेत्री आहे. जर तिने हा रोल केला तर मला आनंदच होईल. लवकरात लवकर या चित्रपटावर काम सुरु व्हावे असे मला वाटते. सध्या मी या पुस्तक प्रकाशनामध्ये व्यस्त आहे.
हाफ गर्लफ्रेन्ड चित्रपटाची उत्सुकता सगळ््यांनाच लागलेली आहे, हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल ?
-: हाफ गर्लफ्रेन्डची शूटिंग जवळपास संपत आली आहे. चित्रपटाचे म्युझिक अतिशय छान आहे. अर्जुन-श्रद्धाने त्यांच्या भूमिकांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्या दोघांनीही पुस्तक वाचले नव्हते, आम्ही त्यांना थेट स्क्रिप्ट वाचायला सांगितली. कारण चित्रपट करताना तुम्हाला थोडे फार बदल करावे लागतात. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.
तु महिलांच्या मुद्द्यांविषयी नेहमीच बोलतोस, आता एक लेखक म्हणुन स्त्रीला पुस्तकातून मांडले आहेस, हा प्रवास कसा होता ?
-: माझ्यासाठी हा प्रवास खरच खुप अवघड होता. कारण माझ्यासाठी एका मुलीच्या दृष्टीकोनातून आणि एक मुलगी म्हणून कथा लिहीणे खरच आव्हानात्मक होते. यासाठी मी काही मुलींना, महिलांना समजुन घेण्याचा प्रयत्न केला. आजही आपल्या देशात पुरुषी अहंकारामध्ये स्त्रीयांची घुसमट होताना दिसते. त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातोय. या पुस्तकाच्या निमित्ताने मी अनेक मुलींशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या आहेत.
तु चित्रपटात अभिनय करताना आम्हाला दिसणार आहेस का ?
-: मला कॅमे-यासमोर यायला खरच खुप लाज नाटते. त्यामुळे मी कधी चित्रपटात अभिनय करीन असे मला वाटत नाही. हाफ गर्लफ्रे न्ड मध्येही माझी छोटीशी भूमिका होती. त्यानिमित्ताने मी पहिल्यांदाच कॅमेºयासमोर आलो होतो . आम्ही तो सीन शूटही केला पण नंतर तो चित्रपटातून वगळण्यात आला. या चित्रपटाची कहाणी थेट माधव झा पासून सुरु होते.
तुझ्या टवीट वरून अनेक वाद-विवाद होतात, त्याबद्दल तुला काय वाटते ?
-: माझे पुस्तक येते तेव्हा जास्त वाद विवाद आणि चर्चा होते. मी एक लेखक आहे आणि समजात घडणा-या घटनांवर बोलणे माझे काम आहे. माझ्या वक्तव्यांशी सर्वच जण सहमत असतीलच असे नाही. मी माझे मत व्यक्त करतो. जर मी बोलणेच थांबवले तर अशा चर्चा किंवा वाद होणार नाहीत. परंतु जर मी माझे विचार मांडणे बंद केले तर मी कसला लेखक.