इब्राहिम-खुशी कपूरच्या 'नादानियाँ' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 09:44 IST2025-03-02T09:43:05+5:302025-03-02T09:44:02+5:30
सिनेमाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

इब्राहिम-खुशी कपूरच्या 'नादानियाँ' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सची एकामागोमाग एक एन्ट्री होत आहे. शाहरुख खान, आमिर खान, बोनी कपूर, रवीना टंडन, चंकी पांडे, सैफ अली खान या कलाकारांच्या मुलांनी गेल्या काही वर्षात पदार्पण केलं आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही (Ibrahim Ali Khan) आता पदार्पणाच्या तयारित आहे. बोनी कपूरची लेक खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) तो रोमँटिक सिनेमात दिसणार आहे. 'नादानियाँ' (Nadaaniyan) असं सिनेमाचं नाव असून नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
साऊथ दिल्लीची मुलगी पिया (खुशी कपूर)आणि मध्यमवर्गीय मुलगा अर्जुन(इब्राहिम अली खान) जो डिबेट टीमच्या कर्णधार बनण्याचं स्वप्न पाहत असतो. या दोघांची ही गोष्ट आहे. पियाला तिची एक सुंदर लव्हस्टोरी हवी असते. पिया आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेमही असतं. मात्र नंतर अर्जुन हे सगळं नाटक करत असल्याचं समोर येतं. दोघांची एक भावनिक कहाणी गुंफण्यात आली आहे. सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
'नादानियाँ' सिनेमा ७ मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. इब्राहिम अली खान ओटीटीच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. सिनेमात महिमा चौधरी, सुनील शेट्टी, दीया मिर्जा, जुगल हंसराज यांच्याही भूमिका आहेत. शौना गौतम यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
इब्राहिम अली खानचा ट्रेलरमधला अभिनय पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी इब्राहिम आणि खुशीला ट्रोल केलं आहे. या स्टारकीड्सपेक्षा महिमा चौधरी, दीया मिर्झा आणि जुगल हंसराजला पाहून चाहते खूश झालेत.