श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकमध्ये जवळीक वाढली; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:34 IST2024-03-10T14:34:01+5:302024-03-10T14:34:49+5:30
गर्दीतून इब्राहिमने पलकला जवळ घेत कारमध्ये बसवलं. यानंतर सोशल मीडियावर त्यांनी रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे का अशा चर्चा सुरु झाल्या.

श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकमध्ये जवळीक वाढली; Video व्हायरल
अभिनेता सैफ अली खानचा मुलगा आणि सारा अली खानचा सख्खा भाऊ इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. लूक्स, फिटनेस यामुळे तो फिल्म इंडस्ट्रीत पदार्पणाच्या आधीपासूनच चाहत्यांमध्ये लोकप्रिय बनला आहे. शिवाय पापाराझींसमोर त्याचा एकंदरच अॅटिट्यूड पाहून तरुणी घायाळ होतात. इब्राहिम आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. तोच आता दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी अनेकदा पार्टी, इव्हेंट्ससाठी एकत्र दिसले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच त्यांचा एकाच कारमधून उतरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वत: इब्राहिम कार चालवत असून पलक बाजूच्या सीटवर बसली आहे. काल रात्री दोघंही नाईट आऊटसाठी आले होते. पलकने यावेळी टाईट क्रॉप टॉप आणि जीन्स घातली होती. तर इब्राहिम कॅज्युअल लूकमध्ये होता. पापाराझींना पोज न देताच ते आतमध्ये गेले. तसंच बाहेर आल्यानंतर गर्दीतून इब्राहिमने पलकला जवळ घेत कारमध्ये बसवलं. यानंतर सोशल मीडियावर त्यांनी रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे का अशा चर्चा सुरु झाल्या.
इब्राहिम आणि पलकला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलही केलं जात आहे. कोणी इब्राहिमची बाजू घेऊन तुला यापेक्षा चांगली मिळाली असती अशा कमेंट्स केल्या आहेत. तर पलकला हाच मिळाला होता का असं म्हणत अनेकांना श्वेता तिवारीलाच नावं ठेवली आहे. इतकंच नाही तर अमृता सिंह आणि सारा दोघीही यांचं रिलेशनशिप स्वीकारणार नाहीत अशीही कमेंट नेटकऱ्याने केली आहे.
दरम्यान बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सच्या अफेअर्सच्या चर्चा जोर धरुन आहेत. इब्राहिम पलकशिवाय रवीना टंडनची लेक राशा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खानही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या 'आर्चीज' मधील को स्टारला डेट करत आहेत. तर शाहरुखची लेक सुहाना खान आणि बिग बींचा नातू अगस्त्य नंदा यांच्याही रिलेशनशिपची बी टाऊनमध्ये चर्चा आहे.