सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:52 IST2025-04-17T11:51:42+5:302025-04-17T11:52:01+5:30
नुकत्याच एका मुलाखतमध्ये सैफ अली खानचा लेक इब्राहिम याने साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं.

सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला...
Ibrahim Ali Khan: स्टारकिडचं बॉलिवूड पदार्पण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय असतो. नुकतंच दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा नातू, अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट 'नादानियां' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. इब्राहिमचा पदार्पणाचा चित्रपट असल्याने याची जोरदार चर्चा झाली. त्याचा हा सिनेमा चांगलाच आपटला, मात्र त्याच्या हँडसम लूक्सवर सगळे फिदा झाले. 'नादानियां'नंतर इब्राहिम हा 'सरजमी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारनसोबत झळकला आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतमध्ये साऊथ इंडस्ट्रीचं कौतुक केलं आहे.
नुकतंच इब्राहिमने फिल्मफेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर संवाद साधला. शूटिंगच्या पहिल्या दिवसाबद्दल तो म्हणाला, "खरंतर, मी पहिल्यांदा ज्या चित्रपटासाठी शूट केला, तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्या चित्रपटात मी अभिनेत्री काजोल (Kajol ) आणि दक्षिणेतील सुपरस्टार पृथ्वीराज ( Prithviraj Sukumaran ) यांच्यासोबत काम केलं आहे".
दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराजचा उल्लेख इब्राहिमनं पॉवरहाऊस म्हणून केला. इब्राहिम म्हणाला, "पृथ्वीराज यांच्यासोबत काम करणे हे आयुष्य बदलून टाकणारं होतं. ते खूप चांगले व्यक्ती आणि मोठे स्टार आहेत. त्यांचे निरीक्षण करून मी खूप काही शिकलो. पृथ्वीराज हे स्वत: एक पॉवरहाऊस आहेत". तर काजोल ही एक अद्भुत अभिनेत्री असल्याचं इब्राहिमने म्हटलं.
बॉलिवूडचा स्टार किड असलेल्या इब्राहिमनं साऊथ इंडस्ट्रीचं कौतुकही केलं. तो म्हणाला, "मला साऊथ इंडस्ट्री प्रचंड आवडली आहे. त्याच्यात एक खास बाब आहे. मला साऊथ इंडस्ट्रीत काम करायचं आहे. पण, माझ्यासोबत कोण काम करेल? मला आशा आहे की तिकडे काम करण्याची मला संधी मिळेल".
पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर अभिनय करतानाचा अनुभव सांगितला. तो म्हणाला," माझा पहिला दिवस खूप अस्वस्थ करणारा होता. सगळंच कठीण होतं. पण मी दोन वर्षे असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केल्यामुळे मला चित्रपट बनवण्याबद्दल बरेच काही माहित होतं. अगदीच उठून तुम्ही कॅमेऱ्यासमोर जाऊ शकत नाही. कारण जेव्हा कॅमेरा चालू होतो आणि तुमच्याभोवती २०० लोक असतात. "रोल कॅमेरा, अॅक्शन!" हे शब्द कानावर पडतात, तेव्हा तेव्हा फक्त तुम्ही आणि तो क्षण असतो. त्या क्षणी काय घडतं, तुम्हाला स्वतःला माहित नसतं".