...तर 'बजरंगी भाईजान' आणखी हिट झाला असता, खुद्द सलमान खाननेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:29 PM2023-05-03T20:29:32+5:302023-05-03T20:30:05+5:30
ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'साठी सलमानने वेगळ्या क्लायमॅक्सचा विचार केला होता.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सलमान खानसोबत हर्षाली मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती, जिने या चित्रपटात मुन्नी उर्फ शाहिदाची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ८ वर्षे झाली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबतची एक गोष्ट आता समोर आली आहे.
सलमान खानने आजवरच्या कारकिर्दीत बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावलं आहे. 'बजरंगी भाईजान' हा एक असाच चित्रपट आहे, ज्याने अबालवृद्धांना खिळवून ठेवलं. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबतची एक गोष्ट आता समोर आली आहे. 'बाहुबली' फेम राजामौली जर या चित्रपटाचे दिग्दर्शक असते तर याचा क्लायमॅक्स खूप वेगळा असता आणि तो जास्त प्रभावी झाला असता असं सलमाननं म्हटलं आहे.
याबाबत सलमान म्हणाला की, या चित्रपटात मी साकारलेल्या पवनने मुन्नीला तिच्या आईपर्यंत पोहोचवायला हवं होतं आणि त्यानंतर त्याला गोळी मारली जायला हवी होतं असं राजामौलींना वाटत होतं. याबाबत राजामौलींनी त्यांचे वडील लेखक विजयेंद्र प्रसाद यांच्याशी चर्चाही केली होती. सलमानच्या मताप्रमाणे जर राजामौलींची सूचना मान्य केली असती तर फिल्म आणखी मोठी हिट झाली असती.