'सिनेमात काम मिळालं नाही तर मी...', सुशांत सिंग राजपूतचा व्हिडिओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:17 PM2020-06-17T16:17:22+5:302020-06-17T16:17:53+5:30
सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद सुरू झाल्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने एवढे टोकाचे पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशात सोशल मीडियावर त्याचे बरेच जुने व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र नेपोटिझमचा वाद सुरू झाल्यानंतर सुशांतचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. ज्यात त्याने सिनेमात काम मिळाले नाही तर त्याचा काय प्लान आहे हे याबद्दल सांगितले.
सुशांतचा हा व्हिडिओ सेलिब्रेटी फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सुशांत सांगताना दिसतो, 'जेव्हा मी टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडली तेव्हा मी विचार केला होता की, मला जर सिनेमात काम मिळाले नाही तर मी फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टिन सुरू करेन. स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करेन.'
सुशांत राजपूतने पहिला सिनेमा काय पोछेसाठी बारा वेळा ऑडिशन दिली होती. हे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे. तो या व्हिडिओत म्हणाला की, माझा जो पहिला सिनेमा आहे 'काय पो छे' त्याच्यासाठी मी 12 वेळा ऑडिशन दिली होती. दुसरा सिनेमा पीके त्यासाठी मी 3 वेळा ऑडिशन दिली आहे. माझा तिसरा सिनेमा यशराज बॅनरचा होता. ज्यासाठी मी 1 महिना वर्कशॉप केले होते आणि ऑडिशन दिली होती. बेस्ट पार्ट हा होता की, अभिषेक, आदित्य चोप्रा किंवा मिस्टर हिरानी यांनी माझे टीव्हीवरील काम पाहिले नव्हते आणि त्यांना माहित सुद्धा नव्हते की मी कोण आहे. त्यांनी माझे ऑडिशन व्हिडीओ पाहून माझी निवड केली होती.
सुशांतच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.