मी कोणाच्याही बाळाला अटक केली नाही, भगत सिंग...; आर्यन खान प्रकरणावर समीर वानखेडे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:36 IST2025-01-02T15:36:01+5:302025-01-02T15:36:30+5:30
मी कोणत्या लहान मुलाला अटक केली नव्हती. २३ वर्षांचे असताना भगत सिंग यांनी देशासाठी आपला जीव दिला होता. तुम्ही त्यांना लहान मुल म्हणू शकत नाही, असा टोलाही वानखेडे यांनी हाणला.

मी कोणाच्याही बाळाला अटक केली नाही, भगत सिंग...; आर्यन खान प्रकरणावर समीर वानखेडे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
कोरोना काळात मुंबईतील समुद्रात आलिशान कॉर्डेलिया क्रूझवर नारकोटिक्सची रेड पडली आणि बॉलिवुड विश्वात खळबळ उडाली होती. किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे ड्रग्स सापडल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर त्याला अटक करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप झाले होते. कथित खंडणीखोरी, बनावट कागदपत्रांच्या वादात सापडल्याने वानखेडे यांची एनसीबीतून दुसरीकडे पोस्टिंग करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी आता वानखेडे यांची या प्रकरणावर बोलकी प्रतिक्रिया आली आहे.
शाहरुख खानच्या मुलावर कारवाई करण्यात आल्याने वानखेडे टार्गेटवर आले होते. वानखेडेंनीच चॅट लीक केले का? आर्यन खानला अटक केली ते योग्य होते का यावर आता त्यांनी मत व्यक्त केले आहे. आर्यन खान २५ दिवस तुरुंगात होता. तेव्हा झोनल डायरेक्टर असलेल्या वानखेडेंनाही मोठ्या संकटांना समोरे जावे लागले होते.
आर्यन खानला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आलेले असले तरी वानखेडेंची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या काळात शाहरुख आणि वानखेडेंचे चॅट लीक झाले होते. यावर वानखेडेंनी आपण हे चॅट लीक केलेले नाहीत, असे म्हटले आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर तुम्हाला टार्गेट केले गेले का, या प्रश्नावरही त्यांनी मी असे म्हणू शकत नाही, परंतू मला मध्यमवर्गीयांकडून खूप प्रेम मिळाले, असे वानखेडे म्हणाले.
कधीकधी मला वाटते की जे घडले ते ठीकच होते. बडे लोक नियमाच्या वर नाहीत. यामुळे मला याचा पश्चाताप झालेला नाही. पुन्हा जर मला संधी मिळाली तरी मी तेच करेन, असे वानखेडेंनी म्हटले आहे. चॅट लीकवर मी काही बोलू शकत नाही. मी कोर्टात अॅफेडेव्हिट दिले आहे. मी एवढाही कमजोर नाही की चॅट लीक करेन, असे ते म्हणाले.
चॅट लीक करून शाहरुख आणि आर्यनला पीडित दाखविण्यात आले काय वरही त्यांनी ज्याने कोणी असे केले मी त्याला म्हणेन आणखी प्रयत्न कर, मी कोणत्या लहान मुलाला अटक केली नव्हती. २३ वर्षांचे असताना भगत सिंग यांनी देशासाठी आपला जीव दिला होता. तुम्ही त्यांना लहान मुल म्हणू शकत नाही, असा टोलाही वानखेडे यांनी हाणला. झी न्यूजने या मुलाखतीची बातमी केली आहे.