जर ‘हा’ चित्रपट हिट झाला असता, तर अक्षय-ट्विंकलचे लग्न झालेच नसते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 03:31 PM2018-03-24T15:31:42+5:302018-03-24T21:01:42+5:30

हटके भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणाºया अभिनेता अक्षयकुमारची लव्हस्टोरीही हटकेच आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाचा ...

If this movie was a hit, Akshay-Twinkle would not have got married! | जर ‘हा’ चित्रपट हिट झाला असता, तर अक्षय-ट्विंकलचे लग्न झालेच नसते!!

जर ‘हा’ चित्रपट हिट झाला असता, तर अक्षय-ट्विंकलचे लग्न झालेच नसते!!

googlenewsNext
के भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणाºया अभिनेता अक्षयकुमारची लव्हस्टोरीही हटकेच आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हाच अक्षयने ट्विंकला लग्नाची मागणी घेतली होती. मात्र ट्विंकलने अक्षयसमोर एक विचित्र अट ठेवली होती. ट्विंकलने अक्षयला म्हटले होते की, जर माझा हा चित्रपट फ्लॉप झाला तरच मी तुझ्याशी लग्न करणार. पुढे हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अक्षय-ट्विंकल लग्नाच्या बंधनात अडकले. पण जर हा चित्रपट हिट ठरला असता तर कदाचित ट्विंकल-अक्षय यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल वेगळे चित्र असते. 

अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती. डिम्पल कपाडिया यांनीदेखील ट्विंकलसोबत लग्न करण्यास उत्सुक असलेल्या अक्षयसमोर एक अट ठेवली होती. त्यांच्या अटीनुसार या दोघांना वर्षभर लिव इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते, जर या वर्षभराच्या काळात त्यांच्यामध्ये सर्व काही आलबेल राहिले तरच त्या त्यांच्या लग्नाला परवानगी देणार होत्या. डिम्पल यांच्या अटीनुसार अक्षय आणि ट्विंकल वर्षभर लिव इनमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये लग्न केले. 



पुढे ट्विंकलने आरवला २००२ मध्ये जन्म दिला. त्यानंतर २०१२ मध्ये नितारा नावाच्या मुलीला जन्म दिला. नितारा जन्म होण्याअगोदरही ट्विंकलने अक्षयकुमारसमोर एक अट ठेवली होती. या अटीनुसार अक्षयने योग्य त्या चित्रपटांमध्येच काम करावे अन्यथा ती दुसºया अपत्याबद्दल विचार करणार आहे. अक्षयने ट्विंकलची अट मान्य केल्यानंतरच या दोघांनी दुसºया अपत्याचे प्लॅनिंग केले. 

अक्षयकुमार इंडस्ट्रीतील असा अभिनेता आहे, जो रात्री उशिरापर्यंत कधीच काम करीत नाही. तसेच सकाळी ४ वाजता उठून तो त्याच्या दैनंदिन कामाला सुरुवात करतो. या लाइफस्टाइलमध्ये पत्नी ट्विंकलही त्याला साथ देते. जेव्हा निर्माता करण जोहरने ट्विंकलला विचारले होते की, अक्षयच्या या सवयी तुला आत्मसात करण्यासाठी किती काळ लागला? तेव्हा ट्विंकलने म्हटले की, मी सुरुवातीपासूनच लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे पसंत करते. ट्विंकलने सांगितले होते की, दररोज रात्री मी आणि अक्षय रमी खेळत असतो. 

Web Title: If this movie was a hit, Akshay-Twinkle would not have got married!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.