"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:49 PM2024-01-10T17:49:39+5:302024-01-10T18:18:29+5:30
बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो.
बॉलिवूडमधील नेपोटीझन, कास्टींग काऊच नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. बॉलिवूमध्ये स्टार किड्संना सहज संधी मिळते, पण स्ट्रगलिंग अभिनेता किंवा अभिनेत्रींना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अनेकदा अभिनेत्रींना कास्टींग काऊचचा शिकारही व्हाव लागलं आहे. बॉलिवूडच्या झगमगाटापलिकडेही पडद्यासमोर न येणार वास्तव लपलेलं आहे. बहुतांशवेळा सिनेसृष्टीतील दिग्गज कलांकारांकडूनच ही दुसरी बाजू समोर आणली जाते. आता, मोठ्या संघर्षमय प्रवासातून बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केलेल्या पंकज त्रिपाठी यांनीही बॉलिवूडमधील स्टेरिओटायपिंगवर भाष्य केलं आहे.
बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो. बॉलिवूडने हे ठरवून टाकलंय की, डॉक्टर असा असतो, इंजिनिअर तसा दिसतो. एखाद्या गर्दीच्या सीनसाठीही कलाकारांची निवड करायची झाल्यास अगोदरच मागणीमध्ये त्याचं वर्णन केलं जातं. रिच लूक, कार्पोरेट लूक असं लिहून कलाकाराची मागणी केली जाते. म्हणजेच हे आपण विभागून ठेवलं आहे, जे योग्य नाही, असे पंकज त्रिपाठी यांनी म्हटलं.
पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमधील स्टेरिओटायपिंगवर भाष्य करताना थेट जगातील गर्भश्रीमंत आणि भारतातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचंच उदाहरण दिलं. समजा मुकेश अंबानी अभिनेता असते, इंड्रस्ट्रियल लाईनमध्ये एवढ दिग्गज नसते. त्यावेली, त्यांना ऑडिशन देण्यासाठी जायचं असतं तर, कधीच त्याचं कास्टींग श्रीमंत माणसासाठी झालं नसतं. कारण, त्यांच्याकडे रीच लूक नाही, असे पंकज त्रिपाठी यांनी म्हटलं. तसेच, रीच लूक असतो काय, देशाचे सर्वात मोठे उद्योगपती आहेत ते. पण, सर्वांनी तसं ठरवून टाकलंय. पोलीस असा दिसतो, श्रीमंत तसा दिसतो, गरीब असा दिसतो, मात्र समाजात तसं काहीही नाही, असेही अभिनेता त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत
दरम्यान, पंकज त्रिपाठी यांनी गँग्ज ऑफ वासेपूर, फुकरे, बरेली की बर्फी, मसान, फुकरे रिटर्न, स्त्री, ओएमजी २ यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. लवकरच त्यांचा मै अटल हूँ हा चित्रपट प्रदर्शित होत असून देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.