​अक्षय नाही तर सुशांतसिंग दिसणार ‘फाईव्ह’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 11:53 AM2016-11-13T11:53:29+5:302016-11-13T11:57:44+5:30

‘मेरी कोम’ आणि ‘सरबजित’ फेम ओमंग कुमारचा आगामी सायको थ्रीलर चित्रपट ‘फाईव्ह’मध्ये अक्षय कुमार नसून सुशांतसिंग राजपूत दिसणार आहे. ...

If not Akshay, Sushant Singh will appear in 'Five' | ​अक्षय नाही तर सुशांतसिंग दिसणार ‘फाईव्ह’मध्ये

​अक्षय नाही तर सुशांतसिंग दिसणार ‘फाईव्ह’मध्ये

googlenewsNext
ेरी कोम’ आणि ‘सरबजित’ फेम ओमंग कुमारचा आगामी सायको थ्रीलर चित्रपट ‘फाईव्ह’मध्ये अक्षय कुमार नसून सुशांतसिंग राजपूत दिसणार आहे.

गेली अनेक महिने अक्षयचे नाव आघाडीवर होते. मध्यंतरी त्याने होकारसुद्धा दिल्याची चर्चा होती. मात्र, आता या प्रोजेक्ट जवळच्या सुत्रांनुसार ‘फाईव्ह’मध्ये सुशांत प्रमुख भूमिकेत आहे.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तो एक-दोन नाही तर तब्बल पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘एम. एस. धोनी’च्या प्रचंड यशानंतर त्याने स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट आहे. पुढील वर्षभर तो व्यस्त असूनही त्याने पटकथा आवडल्यामुळे या सिनेमाला तारखा दिल्या आहेत.


अक्षय कुमार

वर्षाच्या शेवटी शूटींग सुरू होणार होती; मात्र कास्टिंगच्या दिरंगाईमुळे आता ते पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत ढकलण्यात आले. प्रामुख्याने लंडनमध्ये सिनेमाचे शूटींग होणार असून अद्याप अभिनेत्रीची निवड होणे बाकी आहे.

तत्पूर्वी ‘सरबजित’ रिलीज झाल्यानंतर मे महिन्यातच ओमंगने ‘फाईव्ह’ची घोषणा केली होती. सुरुवातीला अक्षय कुमारची निवड झाल्याची वृत्त होते. एवढेच नाही तर, मिथुन, जीत गांगुली आणि अमाल मलिक या संगीतकारांना घेण्याची अट अक्षयने ठेवली होती. ती मान्यसुद्धा झाली. पण आता अक्षयचा पत्ता कट करून सुशांतीच वर्णी लागलेली आहे.


एम. एस. धोनी आणि सुशांतसिंग राजपूत

सुशांतसिंगसाठी यंदाचे वर्ष फार चांगले राहिले आहे. धोनी बायोपिकच्या यशाने त्याच्या करिअरला चांगलीच उभारी मिळाली. ‘ब्योंमकेश बक्षी’च्या अपयशामुळे तो चिंतित होता.

Web Title: If not Akshay, Sushant Singh will appear in 'Five'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.