​भाषा बदल नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल...! उदय चोप्राला मिळाली धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 07:14 AM2018-03-26T07:14:15+5:302018-03-26T12:44:15+5:30

बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र तो कमालीचा अ‍ॅक्टीव्ह आहे. सोशल मीडियावर अनेक सामाजिक ...

If not change language will destroy you and your family ...! Uday Chopra gets threat! | ​भाषा बदल नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल...! उदय चोप्राला मिळाली धमकी!!

​भाषा बदल नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल...! उदय चोप्राला मिळाली धमकी!!

googlenewsNext
लिवूड अभिनेता उदय चोप्रा बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र तो कमालीचा अ‍ॅक्टीव्ह आहे. सोशल मीडियावर अनेक सामाजिक मुद्यांवरची मतं उदय मांडत असतो. पण त्याचे ताजे मत एका वादाचे कारण ठरले आहे. होय, आपल्या ताज्या पोस्टमध्ये उदयने जे काही लिहिले त्यानंतर ट्रोलर्सनी त्याला व त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.



काही क्षणांपूर्वी उदयने इन्स्टाग्रामवर एक कोट शेअर केले. ‘काम करणारे दोन हात प्रार्थना करणा-या हजारों हातांपेक्षा अधिक काम करू शकतात,’ असे हे कोट होते. उदयची ही पोस्ट एक गर्भित संदेश देणारी आहे. पण काही धार्मिक कट्टरवाद्यांना मात्र उदयची ही पोस्ट चांगलीच खटकली. एक ट्रोलर तर उदयची ही पोस्ट पाहून इतका भडकला की, त्याने उदय आणि त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन टाकली. ‘ तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणे हेच आयुष्याचे मिशन बनू शकते. स्वत:च्या आर्थिक सुबत्तेवर प्रेम असेल तर स्वत:ची भाषा बदल. अन्यथा प्रार्थना करणा-या त्या तमाम लोकांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवरही उतरू शकतो. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचा श्रीमंतीचा माज उतरू शकतो. तुझ्या दरवाज्यावर दिसण्यापूर्वी आणि तुझ्या आईला हे सांगण्यापूर्ची की, तू प्रार्थना करणाºयांशी कसा वागतो, बदल...’, असे या ट्रोलरने लिहिले आहे.



ALSO READ : रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता?

या ट्रोलरचा हा मॅसेज वाचताच उदयने तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्व चाहत्यांसोबत शेअर केला. टिष्ट्वटरवरही त्याने या पोस्टची लिंक शेअर केली. होय, मला ही धमकी मिळाली आहे, असे उदयने लिहिले आहे. 
२००२ मध्ये रिलीज झालेल्या शाहरूख खान व अमिताभ बच्चन यांच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून सुप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्राने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘मुझसे दोस्ती करोगे’,‘मेरे यार की शादी है’ अशा चित्रपटात तो दिसला. ‘धूम’ सीरिजच्या तिन्ही सीरिजमध्येही त्याची वर्णी लागली. पण गेल्या काही वर्षांत तो मोठ्या पडद्यावरून पुरता गायब आहे.

Web Title: If not change language will destroy you and your family ...! Uday Chopra gets threat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.