गर्मीपासून बचाव करायचा तर मग, रणवीर सिंगची स्टाइल करा फॉलो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 12:44 PM2017-04-16T12:44:26+5:302017-04-16T18:17:10+5:30

रणवीर सिंग बॉलिवूडचा एकमेव असा अभिनेता आहे, जो आपल्या ड्रेसिंग स्टाइलने नेहमीच सगळ्यांना आश्चर्यचकीत करीत असतो. कोणतेही स्टेटमेंट असो ...

If you want to protect from heat, then follow Ranveer's style follow! | गर्मीपासून बचाव करायचा तर मग, रणवीर सिंगची स्टाइल करा फॉलो!!

गर्मीपासून बचाव करायचा तर मग, रणवीर सिंगची स्टाइल करा फॉलो!!

googlenewsNext
वीर सिंग बॉलिवूडचा एकमेव असा अभिनेता आहे, जो आपल्या ड्रेसिंग स्टाइलने नेहमीच सगळ्यांना आश्चर्यचकीत करीत असतो. कोणतेही स्टेटमेंट असो रणवीर प्रत्येक ठिकाणी आपल्या अंदाजात एंट्री करीत असतो. त्याच्या ड्रेसिंग स्टाइलवरून तर त्याला बॉलिवूडची ‘लेडी गागा’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी, तर रणवीर विचित्र आउटफिट्स परिधान करून एका पार्टीत पोहोचला होता. त्याचा लुक अगदी कंडोमसारखा दिसत होता. त्यावेळी त्याचा कंडोम लुक चर्चेचा विषयही ठरला होता. आता उन्हाळ्याचे दिवस असून, गर्मीवर मात करण्यासाठी रणवीर अशाच काहीशा अंदाजात आपली स्टाइट मेण्टेड ठेवत आहे. 





उन्हाळ्यातून बचाव करणाºया ड्रेसमध्ये कॅमेºयात कैद झालेल्या रणवीरचा हा लुक त्याच्या इतर लुकप्रमाणेच अगदीच बिनधास्त होता. फोटोमध्ये तो लूज वेस्ट आणि शार्ट्स डोक्यावर पांढºया आणि लाल रंगाची कॅप घातलेला दिसत आहे. सोबतच गर्मीपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी त्याने कूल असे शेड्स घातलेले आहेत. रणवीरचा हा लुक बघून कोणीही असे म्हणेल की, तो गोव्याच्या बीचवर मस्ती करण्यासाठी जात आहे. मात्र वास्तविकता ही आहे की, रणवीरने गर्मीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ही नवी स्टाइल केली आहे. 





असो, रणवीरच्या या बीयर्ड लुकविषयी बोलायचे झाल्यास तो त्याच्या आगामी चित्रपटात या लुकमध्ये बघावयास मिळणार आहे. रणवीरचा हा लुक सध्या व्हायरल झाला असून, त्याच्या फॅन्सला तो भावत आहे. त्याचबरोबर गर्मीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणता फंडा वापरावा असा जणू काही सल्लाच रणवीरने दिला आहे. 

Web Title: If you want to protect from heat, then follow Ranveer's style follow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.