IFFI 2017: ​इफ्फीच्या रेड कार्पेटवर उतरली जान्हवी कपूर अन् खिळल्या सा-यांच्या नजरा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 06:59 AM2017-11-21T06:59:39+5:302017-11-21T12:31:47+5:30

गोव्यात रंगणा-या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात इफ्फीला (IFFI 2017) सुरुवात झालीय. काल सोमवारी  IFFI 2017चे उद्घाटन झाले.  ...

IFFI 2017: I have seen on the red carpet of IFFI, the look of Jahnavi Kapoor and Nila Sa ...! | IFFI 2017: ​इफ्फीच्या रेड कार्पेटवर उतरली जान्हवी कपूर अन् खिळल्या सा-यांच्या नजरा...!

IFFI 2017: ​इफ्फीच्या रेड कार्पेटवर उतरली जान्हवी कपूर अन् खिळल्या सा-यांच्या नजरा...!

googlenewsNext
व्यात रंगणा-या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात इफ्फीला (IFFI 2017) सुरुवात झालीय. काल सोमवारी  IFFI 2017चे उद्घाटन झाले.  शाहरूख खान, श्रीदेवी, बोनी कपूर, शाहिद कपूर, नाना पाटेकर, राधिका आपटे असे बॉलिवूडचे अनेक स्टार्स  या उद्घाटन सोहळ्याला पोहोचले. पण यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या श्रीदेवीची लाडकी लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्यावर. आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्यासह जान्हवी IFFI 2017च्या रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. अनामिका खन्नाने डिझाईन केलल्या रेड अ‍ॅण्ड ब्राऊन स्लीवलेस चोलीसोबत मॅचिंग पॅन्ट आणि लहंगा अशा ट्रॅडिशनल लूकमध्ये जान्हवी रेड कार्पेटवर आली आणि तिने सगळ्यांची मने जिंकलीत.





बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रीय स्टार डॉटर जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत ‘धडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेयं. धर्मा प्रॉडक्शन व झी स्टुडिओ निर्मित हा चित्रपट ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अलीकडे या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी ६ जुलैला रिलीज होणार आहे. त्यामुळेच सध्या सर्वत्र जान्हवीची



चर्चा आहे. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.जान्हवीची आई श्रीदेवी यावेळी क्रिम कलरच्या साडीत दिसली.  शाहरूखच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी शाहरूखने ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश दिला.





आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार असून त्यात ६८ भारतीय चित्रपटांचे प्रीमियर  असतील.  इफ्फीचे यंदाचे  वैशिष्ट्य म्हणजे दाखविण्यात येणा-या चित्रपटांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. जागतिक चित्रपटांच्या विभागात आॅस्करसाठी पाठविलेल्या २८ चित्रपटांचा समावेश असून महोत्सवात एकूण १0 जागतिक प्रिमियर, १0 आशियाई चित्रपट प्रिमियर होतील. काही हिंदी चित्रपटांचेही प्रिमियर याठिकाणी होणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात यंदा नऊ चित्रपट दाखवले जातील.आॅस्करसाठी भारतातून नामांकन मिळविलेला ‘न्युटन’ हा सिनेमाही प्रदर्शित केला जाणार आहे. 

ALSO READ :पोस्टर रिलीज! अखेर श्रीदेवीच्या लेकीच्या ‘डेब्यू’चा मुहूर्त ठरला; पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरची गजब केमिस्ट्री!!

Web Title: IFFI 2017: I have seen on the red carpet of IFFI, the look of Jahnavi Kapoor and Nila Sa ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.