IIFA 2016 : ‘बाजीराव-मस्तानी’चा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 10:01 AM2016-06-26T10:01:47+5:302016-06-26T15:31:47+5:30

स्पेनच्या माद्रिद शहरात अनेक बॉलीवूड कलाकारांच्या उपस्थित १७वा आयफा २०१६ अ‍ॅवॉर्ड सोहळा पार पडला. अपेक्षे प्रमाणे संपूर्ण सोहळ्या ‘बाजीराव-मस्तानी’चा ...

IIFA 2016: The Power of Bajirao-Mastani | IIFA 2016 : ‘बाजीराव-मस्तानी’चा दबदबा

IIFA 2016 : ‘बाजीराव-मस्तानी’चा दबदबा

googlenewsNext
पेनच्या माद्रिद शहरात अनेक बॉलीवूड कलाकारांच्या उपस्थित १७वा आयफा २०१६ अ‍ॅवॉर्ड सोहळा पार पडला.

अपेक्षे प्रमाणे संपूर्ण सोहळ्या ‘बाजीराव-मस्तानी’चा दबदबा राहिला. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह पॉप्युलर आणि तांत्रिक गटात मिळून एकूण बारा पुरस्कार मिळाले.

सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘पेशवा बाजीरावा’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंग बेस्ट अ‍ॅक्टर तर ‘पिकू’साठी दीपिकाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला.

‘बाजीराव-मस्तानी’ पाठोपाठ ‘पिकू’ चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे पाच पुरस्कार मिळाले. प्रियंका चोपडासाठी ‘आयफा’ डबल सेलिब्रेशन ठरले. कारण सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री आणि ‘वुमन आॅफ द इयर’ असे दोन पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले.

सोहळ्यात सलमान, हृतिक, टायगर श्रॉफ, दीपिका, प्रियंका सारख्या मोठ्या कलाकारांनी स्टेजवर जबरदस्त डान्स परफॉर्मेन्सेस करून स्पेनमध्ये बॉलीवूडचा डंका वाजविला.

Web Title: IIFA 2016: The Power of Bajirao-Mastani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.