IIFA 2017 : Exclusive न्यूयॉर्कमध्ये फुलतोय सलमान खान आणि कॅटरिना कैफचा रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 05:14 AM2017-07-14T05:14:29+5:302017-07-14T12:51:31+5:30
सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे एकेकाळी कपल होते. सलमान आणि कॅटरिना लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी ...
स मान खान आणि कॅटरिना कैफ हे एकेकाळी कपल होते. सलमान आणि कॅटरिना लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअनंतरही आजही ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सध्या ते दोघेही आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. या दोघांची खूपच चांगली केमिस्ट्री तिथे पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेसाठी ते दोघे वेगवेगळे आले असले तरी नंतर ते सतत एकमेकांसोबतच होते. पत्रकार परिषदेच्या दरम्यान ते दोघे सतत एकमेकांशी बोलत असल्याचे तसेच सलमान कॅटरिनाची टर खेचत असल्याचे दिसून आले. पत्रकार परिषदेत सलमानला बोलण्यासाठी ज्यावेळी विनंती करण्यात आली, त्यावेळी पुरस्कार सोहळा कोणत्या दिवशी आहे हे मला आठवत नाहीये असे तो म्हणाला. त्यावर हा पुरस्कार सोहळा १६ ला आहे असे त्याला सगळ्यांनी सांगितले. त्यावेळी १६ ला पुरस्कार आहे हे मला आठवत नसले तरी या दिवशी कॅटरिनाचा वाढदिवस असल्याचे माझ्या चांगलेच लक्षात असल्याचे त्याने सांगितले आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला विश करूया असे म्हणत त्याने बॅपी बर्थडे कॅटरिना गायला सुरुवात केली आणि यानंतर कॅटरिनाची टर देखील उडवली. तो म्हणाला, बर्थडे गीत गाण्याची सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला माहीत आहे का तुम्ही वाढदिवसाचे गाणे गायले की, तुम्हाला समोरच्याकडून काहीतरी मिळते असे म्हणत त्याने कॅटरिनाला अलिंगन दिले, हे पाहाताच उपस्थितांनी कॅटरिना आणि सलमानसाठी चिअर केले. एवढेच नाही तर कॅटरिनाचा वाढदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला पाहिजे असे देखील त्याने म्हटले.
कॅटरिना आणि सलमानची ही केमिस्ट्री पाहाता कुछ तो गडबड है असे नक्कीच म्हणावे लागेल. कॅटरिना आणि सलमान पत्रकार परिषदेनंतरही एकमेकांशी खूप वेळ गप्पा मारत होते.
सलमान आणि कॅटरिनाची जोडी ही त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. त्यांची ही जवळीक पाहाता त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद होणार यात काही शंकाच नाही.
Also Read : IIFA 2017 :बिपाशा बसू पोहोचली न्यूयॉर्कला; विमानतळावर कुणी ओळखेना!!