जसा नवरा तशी बायको, पाहा दीपवीरच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:37 AM2019-09-19T11:37:45+5:302019-09-19T11:41:56+5:30
दीपवीरच्या स्टायलिश कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळतंय.
बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आयफा रॉक 2019 या अवॉर्ड सोहळ्यात आपल्या अनोख्या अंदाजाने पुन्हा एकदा सा-यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रणवीरने आयफा अवॉर्डसाठी निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला होता या आऊटफिटवर त्याने काळ्या रंगाची काठी हातात घेतली होती. तर दुसरीकडे दीपिकाने जांभळ्या रंगाचा लॉंग गाऊन परिधान केला होता.
त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी वाटत असली तरी दोघांच्या स्टाइल सेन्समुळे त्यांना संमिश्र प्रतिक्रीया मिळताना पाहायला मिळतायेत. तर काही नेटीझन्सना रणवीरचा प्रत्येक अंदाज निराळा पाहायला मिळतोय. तो जे काही करतो तेच तरुणाईचं स्टाइल स्टेटमेंट बनत असल्याचे दिसतंय. त्यामुळे रणवीर सिंहची स्टायलिश अंदाज हा थोडा निराळा असला तरीही इंटरेस्टींग वाटतोय.
मुळात दीपवीर फॅशन सेन्स हा भल्या भल्यांना आकर्षित करतो. एरव्ही फक्त रणवीर सिंह त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असायचा आता त्याच्या पाठोपाठ दीपिकाही आपल्या अनोख्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. यारूनच दीपिकाला कोण्या अभिनेत्रीची नाही तर पती रणवीर सिंहच्या स्टाइल अंदाजाची भुरळ पडल्याचे पहायला मिळते.
मुळात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही रेशीमगाठीत अडकल्यापासून वेगळ्यात ढंगातले कपडे परिधान करत बाहेर फिरताना पाहायला मिळतात. ब-याचदा त्यांच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्लीही उडवली जाते.
आयफा रॉक 2019 अवॉर्डमुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर नेटीझन्सने निशाणा साधला आहे. दीपवीरच्या स्टायलिश कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळतंय. तसेच दीपवीरचा हा लुक चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे.