​IIFA Awards 2018 : टेक्निकल विभागात या चित्रपटांना मिळाले पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 04:42 PM2018-06-23T16:42:47+5:302018-06-23T16:42:47+5:30

बॉलिवूडचा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवार्ड्सची रंगत सुरू झाली आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे २२ जून ते ...

IIFA Awards 2018: Awards for the films received in the technical division | ​IIFA Awards 2018 : टेक्निकल विभागात या चित्रपटांना मिळाले पुरस्कार

​IIFA Awards 2018 : टेक्निकल विभागात या चित्रपटांना मिळाले पुरस्कार

googlenewsNext
लिवूडचा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवार्ड्सची रंगत सुरू झाली आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे २२ जून ते २४ जून दरम्यान यंदाचा आयफा अवार्ड्स सोहळा रंगणार आहे. साहजिकच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी बँकॉकमध्ये दाखल झाले आहेत. या पुरस्काराचे तांत्रिक विभागातील पुरस्कार नुकतेच देण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात जग्गा जासूस, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान या चित्रपटांनी बाजी मारली. 
रणबीर कपूरच्या जग्गा जासूस या चित्रपटाला बॅकराऊंड स्कोर (प्रितम चक्रवर्ती), बेस्ट कोरिओग्राफी (विजय गांगुली आणि रुएल दुसान वरिंदानी) स्पेशल इफेक्ट हॉरर (एनवाय वीएक्सवाला) हे पुरस्कार मिळाले तर नितेश तिवारी यांना बरेली की बर्फी या चित्रपटासाठी बेस्ट स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला. शुभमंगल सावधान या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संवाद (हितेश केवल्य) आणि बेस्ट एडिटिंग (वेंकट मॅथ्यू) हे पुरस्कार पटकावले. 
जब हॅरी मेट सेजल या चित्रपटातील हवायें या गाण्यासाठी अर्जित सिंगला सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मेघना मिश्राने सुपरस्टार या चित्रपटातील मैं कोन हूँ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळवला. 
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक कार्तिक आर्यन आणि आयुषमान खुराना यांनी केले तर नुशरत बरुचा, मॉनी रॉय यांनी परफॉर्मन्स सादर केले. तसेच ऑडियन्समध्ये बसलेल्या अर्जुन कपूरने लुंगी घालत आयुषमान खुरानासोबत हम काले हुए तो क्या हुआ या गाण्यावर ताल धरला. २४ जूनचा समारोपीय सोहळा करण जोहर होस्ट करताना दिसणार आहे. अर्जुन कपूर, वरूण धवन, क्रिती सॅनन या सोहळ्यात खास परफॉर्म करणार आहेत. सदाबहार अभिनेत्री रेखा या २० वर्षांनंतर पहिल्यांदा या सोहळ्याच्या निमित्ताने स्टेज परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. यापूर्वी ३१ जानेवारी १९९८ रोजी रंगलेल्या ४३ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याच्या स्टेजवर रेखा परफॉर्म करताना दिसल्या होत्या. यावेळी त्या ‘ये क्या शहर है दोस्तो’,‘इन आंखो की मस्ती’, ‘सलाम ए इश्क’ आणि ‘दिल चीज क्या है’ या गाण्यांवर थिरकल्या होत्या.

Also Read : IIFA Awards 2018 : ​ आयफाच्या ग्रीन कार्पेटवर सेलिब्रिटींचे ग्रॅण्ड वेलकम! बँकॉकमध्ये बॉलिवूडची मांदियाळी!!

Web Title: IIFA Awards 2018: Awards for the films received in the technical division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.