IIFA Awards 2019: ‘अंधाधुन’ने गाजवली आयफा अवार्ड सोहळ्याची पहिली रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:03 AM2019-09-17T11:03:51+5:302019-09-17T11:03:57+5:30
IIFA Awards 2019: सोमवारी रात्री आयफा अवार्डच्या सोहळ्याला सुरुवात झाली. यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत होतोय.
सोमवारी रात्री आयफा अवार्डच्या सोहळ्याला सुरुवात झाली. यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत होतोय. मायानगरीत हा सोहळा होत असल्याने बॉलिवूड कलाकारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
आयफा अवार्डपूर्वी काल रात्री ‘आयफा रॉक्स 2019’चे आयोजन केले गेले. कतरीना कैफ, राधिका आपटे, विकी कौशल, रकुल प्रीत सिंग, रिचा चड्ढा, अर्जुन रामपाल अशा अनेकांनी या इव्हेंटमध्ये ‘चार चाँद’ लावलेत. याच रात्री चित्रपटांचे तांत्रिक पुरस्कार देण्यात आलेत.
‘अंधाधुन’साठी श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास, पूजा लाढा सुरती आणि योगेश चंदेकर यांना बेस्ट स्क्रिनप्ले पुरस्कार देण्यात आला. याच चित्रपटासाठी पूजा लाढा सुरती यांना बेस्ट एडिटींग तर अजय कुमार पी. बी. यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग अवार्डने गौरविण्यात आले. डेनियल बी जॉर्ज यांना बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर पुरस्कार देण्यात आला.
‘तुम्बड’ या चित्रपटासाठी कुणाल शर्मा यांना बेस्ट साऊंड डिझाईन आणि बेस्ट स्पेशल इफेक्ट्स या श्रेणीत दोन पुरस्कार जिंकले. ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी अक्षत घिल्डियाल यांना सर्वोत्कृष्ट संवादाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘पद्मावत’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि बेस्ट कोरिओग्राफी (घुमर) असे दोन पुरस्कार जिंकलेत.
आयफा अवार्डच्या पहिल्या रात्रीचा हा सोहळा राधिका आपटे आणि अली फजल यांनी होस्ट केला. बिलिनेयर पॉप स्टार ध्वनी भालुशाली हिचा परफॉर्मन्स यावेळी सर्वाधिक गाजला. तिच्याशिवाय नेहा कक्कर, जोनिटा गांधी, तुलसी कुमार, नकश अजीज, जस्सी गिल अशा अनेकांच्या गाण्यांनी या सोहळ्याची पहिली रात्र खास ठरली.