IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 11:49 AM2022-06-05T11:49:20+5:302022-06-05T11:50:03+5:30
IIFA awards 2022 winners list: विकी कौशल याला 'सरदार उधम' आणि क्रिती सेनॉनला 'मिमी'साठी बेस्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कलाविश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयफा पुरस्कार सोहळा (IIFA) नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. ३ जून रोजी आयफा रॉक्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, ४ जून रोजी मुख्य पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये विकी कौशलपासून ते क्रिती सेनॉनसह अनेक कलाकारांनी बाजी मारत पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. त्यामुळेच कोणत्या कलाकाराच्या पदरात कोणता पुरस्कार पडला याची संपूर्ण यादी पाहुयात.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधिरत 'शेरशाह' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर, या चित्रपटाचं उत्तम दिग्दर्शन करणाऱ्या विष्णू वर्धन यांना बेस्ट डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर, दुसरीकडे विकी कौशल याला 'सरदार उधम' आणि क्रिती सेनॉनला 'मिमी'साठी बेस्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.
IIFA पुरस्काराची यादी
Best Picture - शेरशाह
Best Actor In A Leading Role- विक्की कौशल, सरदार उधम
Best Actress In A Leading Role - क्रिती सेनॉन, मिमी
Best Actor In A Supporting Role - पंकज त्रिपाठी, लूडो
Best Actress In A Supporting Role - सई ताम्हणकर, मिमी
Best Debut Male - अहान शेट्टी, तडापी
Best Debut Female - शर्वरी वाघ, बंटी और बबली 2
Best Playback Singer Male - जुबिन नौटियाल, रतन लाम्बियान, शेरशाह
Best Playback Singer Female - असीस कौर, रतन लाम्बियान, शेरशाह
Best Music (Tie) - ए आर रहमान, अतरंगी रे, आणि तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसिन, विक्रम मोंट्रोस, बी प्राक, जानी, शेरशाह
Best Lyrics - कौसर मुनीर, लहर दो, 83
Best Story Original - अनुराग बसु, लूडो
Best Story Adapted- कबीर खान, संजय पूरन सिंह चौहान, 83