‘पैशांसाठी मी चित्रपट करत नाही’

By Admin | Published: June 9, 2017 02:26 AM2017-06-09T02:26:03+5:302017-06-09T02:26:03+5:30

विवेक ओबेरॉयला ‘कंपनी’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी पदार्पणातच ‘फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड’ मिळाले.

'I'm not filming for money' | ‘पैशांसाठी मी चित्रपट करत नाही’

‘पैशांसाठी मी चित्रपट करत नाही’

googlenewsNext

-Geetanjali Ambre
विवेक ओबेरॉयला ‘कंपनी’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी पदार्पणातच ‘फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड’ मिळाले. ‘साथिया’तील त्याच्या भूमिकेमुळे तो प्रकाशझोतात आला. यानंतर आलेले ‘मस्ती’, ‘युवा’ आणि ‘ओमकारा’ यासारख्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आगामी चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाबाबत त्याच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद..
आगामी चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- मी या चित्रपटात एक सीबीआय आॅफिसरची भूमिका साकारतो आहे. ज्याचे नाव अमजद खान आहे. एका बँकेत ३ चोर शिरतात. एक बाबा बनून, एक हत्ती बनून, तर एक घोडा बनून शिरतात. हे चोर नवखे आहेत. पहिल्यांदा चोरी करायला गेले आहेत. त्यामुळे त्यांचा सगळा प्लॅन फसतो, जे करायचे असते ते सगळ त्याच्या उलट होते. जेव्हा त्यांना वाटते यापेक्षा वाईट आपल्याबरोबर काही होऊ शकत नाही. अशावेळी एक खतरनाक सीबीआय आॅफिसर ज्याच्या नावाने सगळे क्रिमिनल घाबरतात तो अमजद खान याठिकाणी हजर होतो. अमजद खान हा आॅफिसर आहे की क्रिमिनल, असा प्रश्न तुम्हाला पडेल. ट्विस्ट आणि टर्नसनी भरलेली माझी भूमिका आहे. हा चित्रपट कॉमेडीबरोबरचे अ‍ॅक्शन थ्रीलर आहे. चित्रपट पाहाताना शेवटच्या क्षणापर्यंत तुमची उत्सुकता नक्कीच ताणून धरेल.

खऱ्या आयुष्यात तू कधी चोरी केली आहेस का?
- होय. मी नेहमीच मुलांचे चॉकलेट चोरून खातो. माझी बायको मला चॉकलेट खाऊ देत नाही. मुलांचे चॉकलेट ती लपवून ठेवते. जेव्हाही मी चॉकलेट चोरून खातो, तेव्हा मी नेहमीच पकडला जातो. कितीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी काही ना काही राहूनच जाते आणि ती माझी चोरी पकडते.

तू आणि रितेश अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेस. रितेशसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- रितेश मला माझ्या कुटुंबीयांप्रमाणेच आहे. आमच्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते आहे. सेटवरदेखील आमची केमिस्ट्री खूप चांगली असते. मी कोणताही चित्रपट जेव्हा करतो, तेव्हा तुम्हाला चित्रपटाच्या टीमसोबत जवळपास १०० दिवस राहावे लागते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या सहकलाकाराची कंपनी एन्जॉय करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर मग असे वाटते कुठे येऊन फसलो आपण. रितेशबरोबर काम करायला मला मजा येते. ‘आॅफस्क्रीन केमिस्ट्री’ तुमची आॅनस्क्रिनसुद्धा दिसते. आम्ही एकमेकांचे सीन्स चांगले होण्यासाठी मदत करतो.

चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींचा तू आधी विचार करतोस?
- मी जेव्हापासून माझा बिझनेस सुरू केला, त्या दिवसापासून मी पैशांसाठी चित्रपट स्वीकारायचे बंद केले. आता ज्या भूमिका मी एन्जॉय करतो त्याच मी स्वीकारतो. मी नुकतेच एक इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी शूट केले आहे. फरहान अख्तरने मला कॉल करून याबाबत विचारले. क्रिकेट लीगवर आधारित हा शो आहे. जुलै-आॅगस्टपर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या माध्यनातून मी पहिल्यांदाच एका वेबसिरीजसाठी शूट केले आहे हे करताना मला खूप मजा आली. ज्या ज्या गोष्टी मला एक्साइटिंग वाटतात मी त्या करतो.
तू तमिळ चित्रपटात काम केले आहेस. अशा बातम्या कानावर येत आहेत यात कित्ती तथ्य आहे ?
- होय. मी तमिळ चित्रपटात काम केले आहे. मी मनात असे पक्के ठरवून बसलो होतो, जेव्हा माझ्याकडे कुणी तमीळ चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन येईल तेव्हा मी फक्तहसून ती स्वीकारून माझ्याकडेच ठेवून देईन. कोण करतेय चित्रपट तिकडे जाऊन. मात्र, ज्यावेळी मला खरंच चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली, तेव्हा मी तिच्या प्रेमात पडलो आणि लगेचच या चित्रपटासाठी मी होकार दिला. त्यांनी मला विचारले तुम्ही तमिळ शिकाल? मी म्हटले होय मी शिकेन. या चित्रपटाचे शूटिंग आम्ही रोमिनिया, सर्गिया, बल्गेरिया देशात जाऊन केले आहे. १२० कोटींचा असा बिग बजेट हा चित्रपट आहे.
तुला मराठी चित्रपटात काम करायला आवडले का?
- होय, नक्कीच आवडेल. कुठलीही इंटरेस्टिंग कन्सेप्ट, स्टोरी जेव्हा माझ्यासमोर येते मला ती करायला मला नक्कीच आवडते. रितेश देशमुखने एका मराठी चित्रपटाचा विषय सांगितला आहे, जो मला खूप आवडला आहे. मी त्याला सांगितले आहे मला कुणीतरी मराठी नीट शिकवणारा पाहिजे. यासाठी रितेश हो म्हणाला आहे. जर सगळी गणिते जुळली, तर कदाचित मी त्या चित्रपटातून मराठीत एंट्री घेईन.

 

Web Title: 'I'm not filming for money'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.