'मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला'; लग्नानंतरचा जिनेलियाने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:57 PM2021-12-21T17:57:26+5:302021-12-21T17:58:04+5:30

जिनेलिया (Genelia Deshmukh) आणि रितेश (Riteish Deshmukh) यांनी २०१२ साली लग्न केले. नुकताच जिनेलियाने तिचा लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.

'I'm so bored of all this'; Genelia Deshmukh told the 'he' story after the wedding | 'मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला'; लग्नानंतरचा जिनेलियाने सांगितला 'तो' किस्सा

'मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला'; लग्नानंतरचा जिनेलियाने सांगितला 'तो' किस्सा

googlenewsNext

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. जिनेलिया आणि रितेश यांनी २०१२ साली लग्न केले. नुकताच जिनेलियाने तिचा लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने लग्नानंतर रितेशला कंटाळून ही गोष्ट मी करू शकत नाही असे सांगितले होते.  

जिनेलियाने सांगितले की, ''जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला वाटल होतं की आता सगळं काही छान झालंय. मात्र मला रोज सकाळी तयार व्हावं लागत होतं. ज्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची. रितेश मात्र रोज बॉक्सर आणि टी-शर्ट घालून जेवणाच्या टेबलवर बसायचा, पण मी रोज ड्रेस आणि दागिने घालून बसायचे. मला त्यावेळी वाटायचं की पूजा वैगेरे काही असल्यास इथे रोज सकाळी नटावं लागतं आणि तयार व्हावं लागतं.''

एक दिवस मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला

तिने पुढे म्हटले की,''मी एक महिना रोज अशी तयार व्हायची आणि शेवटी एकदिवस मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला. मी रितेशला आता मी हे करू शकत नाही असं सांगून टाकलं. त्यावर रितेश मला  'मी स्वत: विचार करत होतो की तू रोज असे कपडे का घालतेस! असं मला म्हणाला.'' जिनेलियाचा हा किस्सा ऐकून सगळेच जण चकित झाले.  जिनेलिया आणि रितेश हे दोघं एकमेकांना 'तुझे मेरी कसम'च्या शूटिंगदरम्यान भेटले होते. नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. 

Web Title: 'I'm so bored of all this'; Genelia Deshmukh told the 'he' story after the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.