मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं... लेकिन टेररिस्ट नहीं! ‘संजू’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज, पाहून व्हाल खल्लास!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 08:49 AM2018-05-30T08:49:42+5:302018-05-30T14:25:39+5:30
यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे ‘संजू’. होय, अभिनेता संजय दत्त याचे बायोपिक ‘संजू’कडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. काही क्षणांपूर्वी या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
य दाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे ‘संजू’. होय, अभिनेता संजय दत्त याचे बायोपिक ‘संजू’कडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. काही क्षणांपूर्वी या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आजपर्यंत संजय दत्तबद्दल आपण केवळ ऐकले होते, गॉसिप्स मॅगझिनमध्ये वाचले होत़े. पण ‘संजू’मध्ये संजयचा संपूर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर आपण पाहू शकणार आहोत. रणबीर कपूर यात संजय दत्तची भूमिका साकारतो आहे. रणबीरने संजयची भूमिका अगदी हुबेहुब पडद्यावर जिवंत केलीय. चित्रपटाच्या टीजरमध्ये हे तुम्ही पाहिलेच. आज रिलीज झालेल्या ‘संजू’च्या ट्रेलरमध्येही हेच दिसले. रणबीरशिवाय चित्रपटातील बहुतांश सगळेच महत्त्वपूर्ण पात्र या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. पाच शहरांत एकाचवेळी हा ट्रेलर रिलीज केला गेला आणि रिलीज झाल्यानंतर यातील रणबीरच्या अभिनयाने प्रत्येकालाच प्रभावित केले.
८० व ९० च्या दशकातील रणबीरच्या रूपातील संजय यात दिसतो. ३़४ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणबीर अर्थात संजयच्या आयुष्यात येऊन गेलेल्या तरूणींची एक झलकीही पाहायला मिळते. माझे मंगळसूत्र कुठे आहे, असे एका सीनमध्ये सोनम कपूर रणबीरला विचारताना दिसते. पण ड्रग्जमध्ये डुबलेला रणबीर तिच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. एका सीनमध्ये अनुष्का शर्मा रणबीरला त्याच्या गर्लफ्रेन्डबद्दल विचारते़ यावर यात प्रोस्टिट्यूलाही जोडू का, असे रणबीर तिला विचारतो. सगळा हिशेब करून माझ्या ३५० गर्लफ्रेन्ड होत्या, असे तो तिला सांगतो.
संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत.