RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:37 AM2022-03-26T11:37:17+5:302022-03-26T11:37:29+5:30

IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे. 

IMDb Rating of RRR diected by SS Rajamouli starring Jr NTR, Ram Charan, Alia Bhatt, Ajay Devgn | RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग

RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग

googlenewsNext

IMDb Rating of RRR: एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांकडूनही सिनेमालाचं कौतक करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरही RRR ची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. असे अंदाज व्यक्त केले जात आहेत की, रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे. 

IMDB काय आहे रेटींग?

राजामौली यांच्या या सिनेमाबाबत IMDB वरही जलवा बघायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाला 9.2 IMDb रेटिंग मिळालं आहे. ही रेटिंग साडे सात हजार लोकांच्या रिव्ह्यूजवर आधारित आहे. 7,668 IMDb यूजर्सपैकी 80.9 टक्के यूजर्सने सिनेमाला १० स्टार्स दिले आहेत. तर 4.9 टक्के प्रेक्षकांनी ९ रेटिंग दिलं आहे. तसेच 8.4 टक्के लोकांनी सिनेमाला एक रेटिंग दिलं आहे. ३ तास ७ मिनिटांच्या या सिनेमाच्या रेटिंगमध्ये पुढे चढउतार बघता येऊ शकतो.

तगडी ओपनिंग

सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच RRR ने नवा इतिहास रचला आहे आणि नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे. ३०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या सिनेमाचा यूएस प्रिमिअर शोज बघण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अशात अशी माहिती समोर येत आहे की, यूएस प्रिमिअर शोजमधून RRR ने ३ मिलियन डॉलर्स म्हणजे २२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. फक्त प्रिमिअरला इतकी कमाई करणारा यूएसमधील हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.

लीक झाला सिनेमा

RRR सिनेमाबाबत फॅन्समध्ये फार उत्सुकता होती. अनेकदा रिलीज डेट पुढे गेल्यानंतर अखेर २५ मार्चला सिनेमा वर्ल्डवाइड रिलीज झाला आहे. सिनेमासाठी अॅडव्हांस बुकिंग करण्यात आली  आणि पहिल्या दिवशीच थिएटर हाउलफुल झाले. अशात बातमी समोर आली की, सिनेमाची एचडी प्रिंट लीक झाली आहे. 

Web Title: IMDb Rating of RRR diected by SS Rajamouli starring Jr NTR, Ram Charan, Alia Bhatt, Ajay Devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.