इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 18:22 IST2020-07-18T18:21:30+5:302020-07-18T18:22:09+5:30
इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे.

इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक
बॉलिवूड अभिनेत्री सायली भगत हिने नुकतेच एका वृत्तपत्राच्या इंस्टाग्राम लाइव्हवरून चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी तिने कमबॅक करत असल्याचे सांगितले.ती भ्रम सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यावेळी सायली भगतने सांगितले की, तिचा आगामी भ्रम हा सिनेमा हा एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा आहे. लवकरच ती काही सिनेमांची निर्मितीही करणार आहे. यासाठी ती प्रॉडक्शन स्किल्सही शिकत आहे.
सायलीने अनेक सुपरहिट सिनेमात काम केले आहे. सायली सध्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलगी इवांकासोबत टाईम स्पेंड करत आहे. मुलगी इवांकासाठी ती खूप खुश आहे असेही तिने सांगितले आहे. तिच्यासोबत सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.
या लाईव्हमध्ये अनेक चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी तिनं चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. इतकंच नाही तर काही चाहत्यांच्या विनंतीनंतर तिनं द ट्रेन सिनेमातील गाणंही गायलं.
सयालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती भ्रम या सिनेमात काम करताना दिसणार आहे. 2004 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिनं इमरान हाशमी आणि गीता बसराच्या द ट्रेन या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. सयालीनं काही सुपरहिट सिनेमेही दिले आहेत.