PICS : ओळखा पाहू कोण? बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणंही मुश्किल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:34 AM2021-08-06T11:34:23+5:302021-08-06T12:17:52+5:30
ब्ल्यू टी-शर्ट, कार्गो पँट व स्रीकर्स आणि पांढरे केस अशा अवतारातील या अभिनेत्याला पापाराझींनी ओळखलं. पण सामान्य लोक त्याला ओळखूच शकले नाहीत.
आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान (imran khan ) याने ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तो आणखी काही सिनेमात दिसला आणि मग अचानक गायब झाला. आता तर त्याला ओळखणंही मुश्किल झालं आहे. होय, नुकताच इमरान खान वांद्र्यात दिसला. यादरम्यानचे त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात तो अगदीच बदलेला दिसला. ब्ल्यू टी-शर्ट, कार्गो पँट व स्रीकर्स आणि पांढरे केस अशा अवतारातील इमरानला पापाराझींनी ओळखलं. पण सामान्य लोक त्याला ओळखूच शकले नाहीत.
काही महिन्यांपूर्वी इमरानचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात तो चांगलाच आजारी दिसत होता. यानंतर इमरानच्या प्रकृतीबद्दल अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.
13 जानेवारी 1983 रोजी जन्मलेल्या इमरानने 2008 मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. आमिरचा भाचा म्हणून त्याच्या या डेब्यूची चांगलीच चर्चा झाली होती. पण पुढे इमरानच्या नावावर अनेक फ्लॉप सिनेमे जमा झालेत आणि त्याच्या फ्लॉप सिनेमांसाठीच तो ओळखला जाऊ लागला.
‘जाने तू या जाने ना’ हा इमरानचा पहिला चित्रपट हिट झाला होता. त्यामुळे पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. 2015 मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही.
इमरान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. म्हणजेच इमरानच्या पर्सनल लाईफमध्येही प्रॉब्लेम्स आहेत. इमरानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे.