इमरान खानपासून विभक्त राहत असलेल्या पत्नी अवंतिकाने शेअर केली पोस्ट, म्हणाली, लग्न आणि घटस्फोट दोनही....
By गीतांजली | Updated: October 20, 2020 19:55 IST2020-10-20T19:55:00+5:302020-10-20T19:55:01+5:30
अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद सुरु आहेत.

इमरान खानपासून विभक्त राहत असलेल्या पत्नी अवंतिकाने शेअर केली पोस्ट, म्हणाली, लग्न आणि घटस्फोट दोनही....
अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद सुरु आहेत, ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार दोघे घटस्फोट घेऊ शकतात. अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यानंतर हा अंदाज लावण्यात येतो आहे की, वेगळे राहिल्यानंतरही दोघांच्या नात्यातील कटुता संपलेली नाही.
अवंतिकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, लग्न करणं कठीण आहे आणि घटस्फोट देखील, आपण आपली स्वतःची कठीण गोष्ट निवडू शकता. यानंतर अवंतिकाने जीवनाच्या कठीण परिस्थितीबद्दल सांगितले आहे. अवंतिकाच्या या पोस्टनंतर दोघांच्या नात्यात सगळं काही अजून ठिक झालेले नाही हेच सांगतेय.
दीर्घकाळापासून अवंतिका आणि इमरान खानच्या नात्यात मतभेद सुरु आहेत. जून 2019मध्ये समोर आले होते की अवंतिकाने इमरानचे घरं सोडून आईकडे राहायला गेली आहे. तेव्हापासून दोघे वेगळेच राहतात येत.