अन् ५ मिनिटात संजय लीला भन्साळींना भेटली त्यांची 'गंगूबाई', आलिया भटने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:03 IST2022-03-09T20:02:59+5:302022-03-09T20:03:47+5:30
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. तसेच या चित्रपटातील आलिया भट(Alia Bhatt)च्या अभिनयाचीही खूप चर्चा होत आहे.

अन् ५ मिनिटात संजय लीला भन्साळींना भेटली त्यांची 'गंगूबाई', आलिया भटने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे, याशिवाय या चित्रपटातील आलिया भट(Alia Bhatt)च्या अभिनयाचीही खूप चर्चा होत आहे. काही लोक आलियाच्या अभिनयाची प्रशंसा करत आहेत तर काही तिच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आलिया या भूमिकेसाठी लहान आहे, असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, भन्साळींनी तिच्या जागी दीपिका पदुकोण किंवा विद्या बालनसारख्या अभिनेत्रीला कास्ट करायला हवे होते. आलिया त्यांची गंगूबाई होणार हे संजय लीला भन्साळींनी अवघ्या पाच मिनिटांतच ठरवले होते. हे संजय लीला भन्साळी यांनी अलीकडेच आलियाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.
आलिया भटने तिच्या इंस्टाग्रामवर मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 'गंगूबाई' त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहे. यादरम्यान आलियाने संजय लीला भन्साळी यांना विचारले, 'तुम्ही माझ्या डोळ्यात असे काय पाहिले की तुम्हाला वाटते की मी गंगूबाईची भूमिका करू शकते?' यावर भन्साळी म्हणाले, 'मी तुझ्या डोळ्यात ती गोष्ट पाहिली आणि तुझ्यात ती गोष्ट पाहिली. ती शक्ती मी तुझ्या डोळ्यात पाहिली आहे.
संजय लीला भन्साळी पुढे म्हणाले की, तुला आठवत असेल की 'इंशाल्लाह'च्या कॉश्च्युम ट्रायलच्या वेळी तू व्हाइट साडी नेसावी अशी माझी इच्छा होती आणि तू सतत विचारत होतीस की मी व्हाइट साडी का घालते. मग त्यांनी तुला लाल ठिक्का लावला, मग तुला राग आला की तुम्ही हा लाल ठिक्का का लावला? यानंतर जेव्हा तुझे केस बांधले गेले तेव्हा तुला समजले की तो लूक 'इंशाल्लाह'साठी केला जात नाही, त्यावेळी माझ्या मनात गंगूबाई चालू होती आणि जेव्हा मी तुझे फोटो पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले की ५ मिनिटांत काय परिवर्तन झाले. तेव्हाच मी ठरवलं की तूच माझी 'गंगुबाई' होणार.