उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:11 IST2024-12-19T10:08:24+5:302024-12-19T10:11:30+5:30

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत येत असते.

in mumbai bollywood actress urvashi rautela rents an 3 bhk apartment rupees 6 lakh per month | उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं

उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं

Urvashi Rautela:बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत येत असते. उर्वशी रौतेला तिच्या अभिनयाबरोबरच फॅशनसेन्ससाठी आणि बोल्ड लूकमुळे लाइमलाइटमध्ये येते. अभिनेत्री तिची स्टाइल आणि लक्झरी लाईफस्टाइलमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्धीझोतात येते. परंतु सध्या उर्वशीची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशी रौतेलाने मुंबईत ३ बीएचके फ्लॅट भाडेतत्वावर घेतला आहे. या अपार्टमेंटमध्ये ती काही काळासाठी तिथेच राहणार आहे. उर्वशीने भाडेतत्वार घेतलेल्या या फ्लॅटचं दरमहा भाडं ६ लाख रुपये इतकं आहे. जवळपास ३६०० स्क्वेअर फूट एरिया असलेल्या या फ्लॅटसाठी तिने फक्त तीन महिन्यांसाठी करार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिच्याच नावाची चर्चा आहे. उर्वशीचं हे रेंट अॅग्रीमेंट १६ डिसेंबरच्या दिवशी रजिस्टर्ड करण्यात आलं आहे. या फ्लॅटसाठी अभिनेत्रीने  १९.५० लाख रुपये डिपोजिट भरल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापही उर्वशीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ३० वर्षीय उर्वशीने सनी देओलच्या 'सिंग साहब द ग्रेट' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'सनम रे','ग्रेट ग्रँड मस्ती' या सिनेमांमध्येही झळकली. सध्याच्या घडीला अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आघाडीटच्या नायिकांपैकी एक आहे. 

Web Title: in mumbai bollywood actress urvashi rautela rents an 3 bhk apartment rupees 6 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.