'रेस ४'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राची लागली वर्णी, सैफ अली खानला देणार दमदार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:35 PM2024-08-24T17:35:33+5:302024-08-24T17:36:34+5:30

Race 4: निर्माते रमेश तौरानी यांनी त्यांच्या आगामी 'रेस ४' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात सैफ अली खानची भूमिका असल्याच्या वृत्ताला निर्मात्यांनी दुजोरा दिला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू आहे.

In 'Race 4', Siddharth Malhotra's character, Saif Ali Khan will have a strong fight | 'रेस ४'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राची लागली वर्णी, सैफ अली खानला देणार दमदार टक्कर

'रेस ४'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राची लागली वर्णी, सैफ अली खानला देणार दमदार टक्कर

सुपरहिट चित्रपट रेसचा चौथा भाग (Race 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेस ४ हा बिग बजेट चित्रपट असेल. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ त्याच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश तौरानी करत आहेत. या चित्रपटात सैफसोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​(Siddharth Malhotra) ​मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वृत्ताने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू आहे.

सूत्रांनुसार, सिद्धार्थ सैफच्या विरुद्ध भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत रमेश तौरानी आणि सिद्धार्थ यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. चित्रपटाचे स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते कलाकारांची घोषणा करतील. चित्रपटाचे स्क्रिप्टिंग जुने लेखक करत आहेत.

रेस ४ने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
रेस ४ मध्ये प्रेक्षकांना धमाका पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी २०२५ मध्ये रेस ४चे प्री-प्रॉडक्शन काम सुरू होईल. प्रेक्षकांना रेस ४मध्ये दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सैफ आणि सिद्धार्थ यांच्यात आमनेसामने दिसणार आहे. चित्रपटात दोन्ही स्टार्स ग्रे कॅरेक्टर्स साकारणार आहेत. चित्रपटाची स्क्रिप्ट नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दोन्ही स्टार्स चित्रपट साइन करतील. सैफ अली खानने रेसच्या सर्व फ्रँचायझींमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सैफ आणि जॉनमधील भांडण दाखवण्यात आले होते. दुसऱ्या भागात सैफ आणि बॉबी देओल यांच्यात फाइट दाखवली होती. चित्रपटातील सर्व भाग लोकांना खूप आवडले आहेत.

Web Title: In 'Race 4', Siddharth Malhotra's character, Saif Ali Khan will have a strong fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.