चार वर्षांपूर्वीच्या प्रकरणामुळे रकुल प्रीत अडचणीत?; ईडीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 01:21 PM2021-09-03T13:21:33+5:302021-09-03T13:21:56+5:30
Drug case: चार वर्षांपूर्वी ईडीने एका ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि दिग्दर्शकांना समन्स बजावले होते.
टॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची आज (शुक्रवारी) ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. काही वेळापूर्वीच रकुलने हैदराबादमधील ईडी Enforcement Directorate कार्यालयात हजेरी लावली आहे. चार वर्षांपूर्वी ईडीने एका ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि दिग्दर्शकांना समन्स बजावले होते. या प्रकरणी आज रकुलची चौकशी केली जाणार आहे. रकुलसह राणा, रवी तेजा, पुरी जगन्नाथ यांनादेखील ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
तेलंगणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित असलेल्या या प्रकरणात रकुलसह अन्य १२ जणांना ईडीने समन्स बजावले आहेत. २०१७ मध्ये या विभागाद्वारे एका बारमध्ये छापा टाकण्यात आला होता. या झाडाझडतीदरम्यान १२ प्रकरणे समोर आली.
Hyderabad | Actor Rakul Preet Singh arrives at the office of Enforcement Directorate (ED), in connection with a drugs case pic.twitter.com/FwvplHmFnI
— ANI (@ANI) September 3, 2021
दरम्यान, या प्रकरणात ११ चार्जशीट दाखल करण्यात आलं असून रकुल प्रीत, राणा दुग्गुबती, पुरी जगन्नाथ आणि रवी तेजा यांची नाव समोर आली आहेत. मात्र, या सगळ्यांचा मनी लाँडरिंग प्रकरणात सहभाग आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.