खरंच महाबळेश्वरजवळ अजय देवगणचे हेलीकॉप्टर क्रॅश झाले काय? जाणून घ्या व्हायरल मॅसेजमागचे सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 03:05 PM2018-05-15T15:05:31+5:302018-05-15T20:35:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने एक मॅसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये ‘महाबळेश्वरजवळ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचे हेलीकॉप्टर ...
ग ल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने एक मॅसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये ‘महाबळेश्वरजवळ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचे हेलीकॉप्टर क्रॅश झाले आहे.’ हा मॅसेज वाचून अजयच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. परंतु आता आम्ही या मॅसेजमागचे खरे वास्तव सांगणार आहोत. कारण ही बातमी वाचून अजयच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळेल. तत्पूर्वी अगोदरच आम्ही स्पष्ट करतो की, अजय पूर्णपणे ठीक असून, तो सुरक्षित आहे.
खरं तर या अफवेचा पर्दाफाश महाबळेश्वरच्या स्थानिक पोलिसांनीच केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, ‘अजयविषयी जो मॅसेज व्हाट्स अॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती पूर्णपणे अफवा आहे. पोलीस सध्या याचा शोध घेत आहेत की, अखेर ही अफवा कोणी पसरविली आहे. दरम्यान, महाबळेश्वरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, जर अजय देवगणचे हेलीकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातमीत तथ्यता असती तर त्याची बातमी सर्वात अगोदर आम्हाला समजली असती. अशातही आम्ही तपास केला. परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ही पूर्णत: अफवा असून, अफवा पसरविणाºयाचा आम्ही शोध घेत आहोत.
खरं तर अशाप्रकारची अफवा पहिल्यांदाच पसरविली जात आहे असे अजिबात नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींविषयी अशाप्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत. काहींना आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे, तर काहींच्या चक्क निधनाचीच अफवा पसरविली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता इंदर कुमारच्या आत्महत्त्येचा व्हिडीओ समोर आला होता, ज्याचे खरे वास्तव त्याच्या पत्नीने सागिंतले.