'ड्रीम गर्ल' सिनेमाचे निर्माते आणि हेमा मालिनींचे सचीव इंदर राज बहल यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 03:46 PM2024-02-25T15:46:08+5:302024-02-25T15:47:56+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड सिनेमांचे निर्माते आणि हेमा मालिनींचे निकटवर्तीय इंदर राज बहल काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध चित्रपट निर्माते इंदर राज बहल यांचं निधन झालं आहे. इंदर राज बहल यांचे 23 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी त्यांची प्रार्थना सभा होणार आहे. हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटासाठी त्यांची ओळख होती. या चित्रपटाचे ते सहनिर्माते होते.
इंदर राज बहल हे अनेक वर्ष हेमा मालिनी यांचे सचिव होते. याशिवाय इंदर राज बहल यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शो देखील तयार केले. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या हेमा मालिनींची आई जया चक्रवर्ती यांच्यासोबत त्यांनी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाची सह-निर्मिती केली. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि हेमा मालिनी यांना नवी ओळख मिळाली.
Kisi Shayar Ki Ghazal, Dream Girl... Dharmendra and Hema Malini in postcard pic from Dream Girl (1977)#dharmendra#dharamji#heman#hemamalini#dreamgirl#70s#bollywoodflashback#kishorekumar#LaxmikantPyarelal#AnandBakshi@aapkadharam@dreamgirlhema@Esha_Deolpic.twitter.com/ZZJF87DFM8
— Movies N Memories (@BombayBasanti) August 15, 2022
इंदर राज बहल यांनी गिरीश कर्नाड आणि शबाना आझमी अभिनीत 'स्वामी'ची सह-निर्मिती केली, ज्याचे दिग्दर्शन बासू चटर्जी यांनी केले होते. 1982 मध्ये इंदर यांची सहनिर्मिती असलेला 'शौकीन' चित्रपटही बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. एलसी सिंग आणि पंकज पराशर यांच्यासोबत त्यांनी करण नाथ यांचा टीव्ही शो 'दर्पण' आणि बासू चॅटर्जींचा टीव्ही शो 'बनारस' ची निर्मिती केली.